नवी दिल्ली: यंदा आयपीएलचा 15 वा हंगाम (15th season of IPL) खेळला जाणार आहे. परंतु या स्पर्धेवर कोरोनाचे काळे ढग दाटले आहे. त्यामुळे ही स्पर्धा कधी खेळवली झाणार आहे. यबाबात कोणत्याही प्रकारचे वोळापत्रक जाहीर झाले नाही. परंतु आता आयपीएल संबंधीत एक बातमी समोर आली आहे. आयपीएल (Indian Premier League) 2022 च्या सीझनचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले जाऊ (IPL 2022 could held South Africa) शकते. कारण गुरुवारी एका वृत्तपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की जर भारतातील कोविड -19 साथीची तिसरी लाट ( Third wave of the Covid-19 ) एप्रिलच्या सुरूवातीस संपली नाही, तर श्रीलंकेकडे देखील आयोजनाचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.
साल 2021 मध्ये, भारतातील आयपीएलचा 14 वा हंगाम 4 मे नंतर स्थगित करण्यात आला होता. कारण कोविड-19 मुळे काही संघांच्या खेळडूंना कोरोनाचे लागण झाली होती. त्यानंतर या स्पर्धेचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये खेळला गेला. या स्पर्धेतील अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला होता. हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला होता.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले ( BCCI official told The Indian Express ) की, “आम्ही नेहमीच यूएईवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेळेतील आणि अंतर खेळाडूंसाठी चांगले आहे.
लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ (Lucknow and Ahmedabad new teams) आयपीएल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आयपीएल 2022 च्या हंगामाचे सामने वाढून स्पर्धा मोठी होणार आहे. असे झाल्यास दक्षिण आफ्रिका दुसऱ्यांदा आयपीएलचे मेजबानी करेल. या अगोदर 2009 हंगाम भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेची निवड करण्यामागचे कारण असे की, सध्या त्यांनी भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह एकदिवसीय मालिकेसाठी चांगली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स दिले आहेत. जिथे ते जैव-बबलमध्ये राहत आहेत. भारतीय संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आयरीन कंट्री लॉजमध्ये थांबला होता आणि सध्या केपटाऊनमधील ताज हॉटेलमध्ये मुक्काम (Taj Hotel in Cape Town) करत आहे.
एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जिथे थांबला होता ती जागा अनेक एकरांमध्ये पसरलेली आहे. ज्यामुळे त्यांना फिरणे सोपे होते. यामुळे मागील काही वर्षांपासून बरऱ्याच परदेशी दौऱ्यांवर असणारे खेळाडूं आपल्या खोलीत राहू शकणार आहेत.