नवी दिल्ली : बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या 15 व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर ( IPL 15th schedule announced ) केले आहे. या स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( KKR v CSK ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
-
🚨 NEWS 🚨: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details 🔽
">🚨 NEWS 🚨: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details 🔽🚨 NEWS 🚨: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details 🔽
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे ( Fifteenth season of IPL ) 70 सामने 65 दिवसात मुंबई आणि पुणे शहरातील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील 20-20 सामने वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर, 15-15 सामने ब्रेबॉर्न आणि एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे होणार आहेत.
-
Hello Fans 👋
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Set your reminders and mark your calendars. 🗓️
Which team are you rooting for in #TATAIPL 2022❓🤔 pic.twitter.com/cBCzL1tocA
">Hello Fans 👋
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
Set your reminders and mark your calendars. 🗓️
Which team are you rooting for in #TATAIPL 2022❓🤔 pic.twitter.com/cBCzL1tocAHello Fans 👋
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
Set your reminders and mark your calendars. 🗓️
Which team are you rooting for in #TATAIPL 2022❓🤔 pic.twitter.com/cBCzL1tocA
तसेच 27 मार्च रोजी ब्रेबॉर्नमधील सामन्याने सुरू होणारा पहिला डबल-हेडर ( Double-header Match ) खेळेल. जिथे दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्याचबरोबर डीवाय पाटील स्टेडियमवर रात्री पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना होणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये 29 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. एकूण 12 डबलहेडर असतील, पहिला सामना साडे तीन वाजता सुरू होईल. त्याचबरोबर संध्याकाळचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार साडे सात वाजता सुरू होतील.
जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने -
- 26 मार्च: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - वानखेडे स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 27 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - सीसीआय - दुपारी 3.30 वा
- 27 मार्च: पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 28 मार्च: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - वानखेडे स्टेडियम – संध्याकाळी 7.30 वा.
- 29 मार्च: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 30 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
- 31 मार्च: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
- 1 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स - वानखेडे स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 2 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
- 2 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - एमसीए स्टेडियम पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 3 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
- 4 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 5 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - वानखेडे स्टेडियम – संध्याकाळी 7.30 वा.
- 6 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 7 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 8 एप्रिल: पंजाब किंग्ज गुजरात टायटन्स - CCI - संध्याकाळी 7.30 वा
- 9 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
- 9 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 10 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - सीसीआय - दुपारी 3.30 वा
- 10 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – वानखेडे – संध्याकाळी 7.30 वा.
- 11 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 12 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 13 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे संध्याकाळी 7.30 वाजता
- 14 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 15 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा
- 16 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – सीसीआय – दुपारी 3.30 वा
- 16 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 17 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
- 17 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे – संध्याकाळी 7.30 वा.
- 18 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा.
- 19 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 20 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 21 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
- 22 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
- 23 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम, दुपारी 3.30 वा.
- 23 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वाजता
- 24 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 25 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 26 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
- 27 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 28 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 29 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 30 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सीसीआय - दुपारी ३.३० वा.
- 30 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
- 1 मे: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
- 1 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे संध्याकाळी 7.30 वाजता
- 2 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 3 मे: गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 4 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
- 5 मे: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
- 6 मे: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा
- 7 मे: पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
- 7 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 8 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – वानखेडे – दुपारी ३.३० वा.
- 8 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 9 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
- 10 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 11 मे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
- 12 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 13 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
- 14 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
- 15 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
- 15 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा.
- 16मे: पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30
- 17 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 18 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
- 19 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 20 मे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
- 21 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
- 22 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.