ETV Bharat / sports

IPL 2022 1st Qualifier RR vs GT : पहिल्या क्वालिफायर मधील पराभवानंतर संजू सॅमसनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला आम्ही....! - tata ipl 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थानचा 7 विकेट्सने पराभव केला. ज्यामुळे गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. पराभवानंतर ही राजस्थान संघाकडे अजून एक संधी आहे. त्याच्या माध्यमातून राजस्थान फायनलमध्ये प्रवेश करु शकते. परभवानंतर कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया ( Sanju Samson Reaction ) दिली.

Sanju Samson
Sanju Samson
author img

By

Published : May 25, 2022, 4:19 PM IST

कोलकाता : आयपीएल 2022 मधील पहिला क्वालिफायर सामना ( IPL 2022 1st Qualifier Match ) मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द गुजरात टायटन्स संघात पार पडला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव ( GT beat RR by 7 Wickets ) केला. त्याचबरोबर फायनल तिकीट मिळवले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मोठी प्रतिक्रिया ( Captain Sanju Samson Statement ) दिली आहे. सॅमसनच्या मते, त्याच्या फलंदाजांनी खूप चांगली धावसंख्या उभारली होती, पण दुसऱ्या डावात फलंदाजी खूप सोपी झाली आणि गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी करत सामना जिंकला.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. तसेच सॅमसनने 26 चेंडूत 47 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स शेवटच्या षटकात अवघ्या तीन विकेट्स गमावून जिंकले. डेव्हिड मिलरने ( David Miller ) 38 चेंडूत 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार लगावत नाबाद 68 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 5 चौकार फटकावत नाबाद 40 धावा केल्या.

आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, पण दुसऱ्या डावात खेळपट्टी खूपच सोपी झाली - संजू सॅमसन

तो सामना संपल्यानंतर म्हणाला, "आम्ही प्रथम फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारली. सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत होता, पण तरीही आम्ही इतक्या धावा करू शकलो. माझ्या मते, गुजरात टायटन्सने सर्वोत्तम मार्गाने धावांचा पाठलाग केला. या सामन्यात जे पाच गोलंदाज खेळत होते ते आमचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. रियान पराग असल्यानेही मदत झाली. मला वाटते की दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे झाले. कारण चेंडू बॅटवर सहज येत होता. आम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट खेळलो. या सामन्यात काही किरकोळ चुका झाल्या. पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचा आमचा प्रयत्न असेल."

पहिल्याच चेंडूपासून मी आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला - संजू सॅमसन

संजू सॅमसन आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला, "ही खेळपट्टी दोन वेगवान प्रकाराची होती आणि बाऊन्स देखील खूप अनियमित होता. मी सुरुवातीपासूनच गोलंदाजांविरुद्ध आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि पॉवरप्लेमध्ये काही धावा करता आल्याने मी भाग्यवान होतो. विकेटवर फलंदाजी करणे सोपे नव्हते आणि सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत होता. तरी आम्ही चांगली धावसंख्या केली."

हेही वाचा - Ipl 2022 Eliminator Lsg Vs Rcb : लखनौच्या सुपरजायंट्सला एलिमिनेटरमध्ये आज बंगळुरुच्या रॉयलचे चॅलेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.