ETV Bharat / sports

IPL 2022 RR vs RCB : सामना संपल्यानंतर रियान परागशी हस्तांदोलन करण्यास हर्षल पटेलने का दिला नकार?

author img

By

Published : Apr 27, 2022, 3:21 PM IST

आयपीएलच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 39 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळला गेला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूवर 29 धावांनी मात केली. या सामन्यानंतर हर्षल पटेलने अगोदर झालेल्या वादामुळे रियान परागशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

RR vs RCB
RR vs RCB

पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूवर 29 धावांनी मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. या विजयात रियान पराग आणि कुलदीप सेनची भूमिका राहिली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 144 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 115 धावांवर आटोपला. या सामन्यानंतर हर्षल पटेलने ( Harshan Patel ) अगोदर झालेल्या वादामुळे रियान परागशी ( Riyan Parag ) हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

20 व्या षटकानंतर रियान आणि हर्षल मध्ये झाला होता वाद - झाले असे की, 19व्या षटकाच्या अखेरीस राजस्थानने 126/8 धावा केल्या होत्या आणि पराग 25 चेंडूत 38 धावा खेळत होता. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात परागने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करताच परागने एका षटकाराने डाव संपवला आणि शेवटच्या षटकात हर्षलने एकूण 18 धावा केल्या. पराग 31 चेंडूत 56 धावा करून नाबाद राहिला, ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. परागने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. हर्षलने चार षटकांत 33 धावा देत एक बळी घेतला.

This was after 2 sixes were hit off the last over pic.twitter.com/qw3nBOv86A

— ChaiBiscuit (@Biscuit8Chai) April 26, 2022

जेव्हा परागने राजस्थानचा डाव शानदारपणे संपवला आणि तो ड्रेसिंग रुमकडे परतण्याच्या मार्गावर होता, पण यादरम्यान तो मागे वळून काहीतरी बोलतांना दिसला. पराग काहीतरी तक्रार करत होता आणि याच दरम्यान हर्षल रागाने काहीतरी बोलत त्याच्याकडे येताना दिसला. मात्र, राजस्थान संघातील एका सपोर्ट स्टाफने परागला आणि हर्षलला पकडून शांत राहण्यास सांगितले.

हर्षल पटेलचा रियान परागशी हस्तांदोलन करण्यास नकार - हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात रियान परागने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. आपले अर्धशतक पूर्ण करताना परागने एक षटकार खेचत डाव संपवला आणि हर्षलच्या शेवटच्या षटकात एकूण 18 धावा झाल्या. याशिवाय राजस्थान रॉयल्सनेही शानदार विजय मिळवला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते. त्यावेळी रियान पराग आणि हर्षल पटेल एकमेकांसमोर आले असताना, हर्षल पटेलच्या मनात इतका राग होता की, त्याने रियानने परागशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यानंतर रियान परागनेही स्वतःचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला ज्यामध्ये त्याने खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा - Rcb Vs Rr Ipl : राजस्थान रॉयल्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 29 धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.