मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज ( Royal Challengers Bangalore vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला शुक्रवारी (12 मे) संध्याकाळी साडेसातला ब्रेबॉर्न स्टेडियवर सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणे खुप महत्वाचे आहे. ज्यामुळे दोन्ही संघाचे प्लेऑफचे भवितव्य ठरणार आहे.
-
Two big hitters finding spots to go 𝗕𝗔𝗡𝗚 𝗕𝗔𝗡𝗚 tonight 🔭😉#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RCBvPBKS @RCBTweets pic.twitter.com/ubOA0is8bV
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two big hitters finding spots to go 𝗕𝗔𝗡𝗚 𝗕𝗔𝗡𝗚 tonight 🔭😉#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RCBvPBKS @RCBTweets pic.twitter.com/ubOA0is8bV
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022Two big hitters finding spots to go 𝗕𝗔𝗡𝗚 𝗕𝗔𝗡𝗚 tonight 🔭😉#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RCBvPBKS @RCBTweets pic.twitter.com/ubOA0is8bV
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु संघ ( RCB Team ) 12 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त दोन विजय आवश्यक आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 11 पैकी 5 सामने जिंकले असून ते आठव्या स्थानावर आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.
विराट कोहली ( Virat Kohli out of form ) वगळता आरसीबीचे सर्व फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोर देखील कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांच्याप्रमाणे चांगली कामगिरी करत आहेत. कोहलीचा आतापर्यंतचा आयपीएल हंगाम चांगला गेला नाही, परंतु तो पंजाबविरुद्ध त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीचे गोलंदाजही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, ज्यात फॉर्मात असलेला जोश हेझलवूड आणि विश्वसनीय हर्षल पटेल यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. पण महत्त्वाच्या प्रसंगी त्याच्याकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा संघ करू शकतो.
-
It’s ROUND 2️⃣ against the Punjab Kings and we’re all set to fight it out. ⚔️ 💪🏻
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tune into @StarSportsIndia from 7:30 PM onwards and catch all the exciting action LIVE from the Brabourne Stadium. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvPBKS pic.twitter.com/xHdSnyPU4i
">It’s ROUND 2️⃣ against the Punjab Kings and we’re all set to fight it out. ⚔️ 💪🏻
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 13, 2022
Tune into @StarSportsIndia from 7:30 PM onwards and catch all the exciting action LIVE from the Brabourne Stadium. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvPBKS pic.twitter.com/xHdSnyPU4iIt’s ROUND 2️⃣ against the Punjab Kings and we’re all set to fight it out. ⚔️ 💪🏻
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 13, 2022
Tune into @StarSportsIndia from 7:30 PM onwards and catch all the exciting action LIVE from the Brabourne Stadium. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvPBKS pic.twitter.com/xHdSnyPU4i
पंजाब किंग्ज संघासाठी ( Punjab Kings Team ) शिखर धवन आणि भानुका राजपक्षे हे आघाडीच्या फळीत चांगले योगदान देत आहेत, तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा डावाचा शेवट चांगला करत आहेत. जॉनी बेअरस्टोचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही पंजाबसाठी आनंदाची बातमी आहे. कर्णधार मयंक अग्रवालने मधल्या फळीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याला आघाडीकडून नेतृत्व करणे आवश्यक आहे.
गोलंदाजीत कागिसो रबाडाने ( Bowler Kagiso Rabada ) आतापर्यंत 18 विकेट घेतल्या आहेत पण तो महागडा ठरला आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता संदीप शर्माकडे आहे. अर्शदीप सिंगने प्रभावी गोलंदाजी केली आहे, विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये जिथे त्याने अचूक यॉर्कर्सने फलंदाजांना अडचणीत आणले आहे. संघात चांगले खेळाडू असूनही, पंजाबचा संघ महत्त्वाच्या प्रसंगी कमी पडतोय, ज्यामध्ये संघाला लवकरात लवकर सुधारणा करावी लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफर्ड, रुदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार आणि सिद्धार्थ कौल.
पंजाब किंग्स : शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.
हेही वाचा - CSK vs MI: मुंबईनंतर आता चेन्नई सुपर किंग्सही बाहेर! MI'कडून चेन्नईचा ५ गडी राखून पराभव