ETV Bharat / sports

IPL 2022 PBKS vs SRH: लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचे हैदराबादला 152 धावांचे लक्ष्य - Cricket News

पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात पंधराव्या हंगामातील 28 वा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या 60 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 151 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद संघाला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे.

PBKS
PBKS
author img

By

Published : Apr 17, 2022, 6:39 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात सुरु आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने ( Captain Ken Williamson ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या 60 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 151 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद संघाल 152 धावांचे लक्ष्य दिले आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या पंजाब किंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब किंग्ज संघाला 2.4 षटकांत 10 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. तो संघाचा नवा कर्णधार शिखर धवनच्या (8) रुपाने बसला. त्यानंतर दुसरा धक्का प्रभसिमरन सिंगच्या रुपाने बसला. त्याने 14 धावांचे योगदान दिले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (12), जितेश शर्मा (11) आणि ओडियन स्मिथ (13) धावांवर बाद झाले. तसेच राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग यांना भोपळा देखील फोडता आला नाही.

पंजाब किंग्ज अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone ) एक बाजू लावून धरताना शानदार फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूचा सामना करताना 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar ) बाद केले. त्यानंतर शाहरुख खानने 26 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे पंजाब संघाला दीडशे धावांचा टप्पा पार केला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने ( Umran Malik ) सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 28 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारने 22 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याबरोबरच भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये आपल्या दीडशे विकेट्सचा टप्पा पार केला. तसेच नटराजन आणि सुचिथने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

हेही वाचा - Asian Mixed Stableford Challenge :वीर अहलावतची एशियन मिक्स्ड चॅलेंज गोल्फमध्ये सर्वोत्तम कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.