हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) चा लीग टप्पा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता प्लेऑफची स्थिती हळूहळू स्पष्ट होत आहे. बर्याच संघांसाठी प्रत्येक सामना आता करा किंवा मरो असा आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा 58 वा सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट्सने राजस्थान रॉयल्सला धूळ चारली.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत काहीही बदल झालेला नाही. तसेच मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचवेळी दिल्लीने राजस्थानला हरवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
आता दिल्लीचे 12 सामन्यांत 12 गुण झाले आहेत. पराभवानंतरही राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. राजस्थानचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत. गुजरातचा शुभमन गिल पुन्हा एकदा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. राजस्थानचा जोस बटलर ऑरेंज कॅप आणि युझवेंद्र चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर ( Yuzvendra Chahal leads Purple Cap race ) आहेत.
आयपीएल 2022च्या गुणतालिकेती स्थिती -गुणतालिकेत गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर कायम असून प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. गुजरातचे १२ सामन्यांत १८ गुण आहेत. लखनौचा संघ 12 सामन्यांत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतरही राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि बंगळुरु संघांचे 14 गुण आहेत. दिल्ली 12 सामन्यांत 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने 11 सामन्यांत 10 गुण मिळवले असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. कोलकाता सातव्या तर पंजाब आठव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे 10 गुण आहेत.
आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. 11 सामन्यांत नऊ पराभवांसह मुंबई दहाव्या स्थानावर कायम आहे. मुंबईचे चार गुण झाले असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (ऑरेंज कॅप)
- जोस बटलर- 12 मॅच 625 धावा
- लोकेश राहुल- 12 मॅच 459 धावा
- डेविड वॉर्नर- 10 मॅच 427 धावा
- फाफ डुप्लेसिस- 12 मॅच 389 धावा
- शुबमन गिल- 12 मॅच 384 धावा
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप)
- युझवेंद्र चहल- 12 मॅच 23 विकेट
- वनिंदु हसरंगा- 12 मॅच 21 विकेट
- कुलदीप यादव- 12 मॅच 18 विकेट
- कगिसो रबाडा- 10 मॅच 18 विकेट
- टी नटराजन- 9 मॅच 17 विकेट
हेही वाचा - Australia tour of Sri Lanka : श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतरही ऑस्ट्रेलिया करणार नियोजित दौरा