मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 38 वा सामना आज (सोमवार) संध्याकाळी साडेलसातला वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवनाल यांच्यात नाणेफेक पार पडली. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ( Chennai Super Kings opt to bowl ) करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
#CSK have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/QHkRVPVYkv
">#CSK have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/QHkRVPVYkv#CSK have won the toss and they will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/QHkRVPVYkv
चेन्नई संघाने ( Chennai Super Kings Team ) मागील सामन्यात मुंबईवर विजय मिळवला होता, त्यामुळे चेन्नई संघ आपल्या पहिल्या रुपात असल्याचे दिसत आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. या अगोदर या हंगामतील 11 वा सामना दोन्ही संघात झाला होता. ज्यामध्ये पंजाब किंग्सने सीएसकेवर 54 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ हा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
दुसरीकडे पंजाब संघाला ( Punjab Kings Team ) आपल्या मागील सामन्यात दिल्लीकडून 9 विकेट्सने दारुन पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच या संघाने आपल्या सात सामन्यात तीन विजय आणि चार पराभव पत्कारले आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या स्थानी आहेत. तसेच आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात या दोन्ही संघात एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्यील पंधरा सामन्यात सीएसकेने बाजी मारली आहे. तसेच अकरा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे.
-
A look at the Playing XI for #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL https://t.co/0QEYxPDVQg pic.twitter.com/MLMfPULxde
">A look at the Playing XI for #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL https://t.co/0QEYxPDVQg pic.twitter.com/MLMfPULxdeA look at the Playing XI for #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
Live - https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL https://t.co/0QEYxPDVQg pic.twitter.com/MLMfPULxde
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि महेश थेक्षाना.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंग.
हेही वाचा - IPL 2022 Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टॉप ऑर्डरच्या खराब कामगिरीमुळे हेसन चिंतेत