मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 56 वा सामना डी. व्हाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसातला सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामातील दोन्ही संघाचा एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Mumbai Indians opt to bowl )आहे.
-
#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #KKR.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/0TDNSwhQXs #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/ztC9mbiYQB
">#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #KKR.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Live - https://t.co/0TDNSwhQXs #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/ztC9mbiYQB#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #KKR.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Live - https://t.co/0TDNSwhQXs #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/ztC9mbiYQB
आयपीएल 2022 च्या हंगामात मुंबई आणि कोलकाता दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. जेव्हा दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आले होते, तेव्हा कोलकाता संघाने मुंबई संघाला पाच विकेट्सने धूळ चारली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात मुंबई मागील पराभवाचा बदला घेण्याची शक्यता आहे. कारण मागील दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
त्याचबरोबर कोलकाता संघाला आपल्या मागील सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना लखनौ संघाने मोठ्या फरकाने पराभूत केले होते. आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात या दोन संघात 30 सामने खेळले गेले आहे. ज्यापैकी 22 सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघाने फक्त 8 सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, रमणदीप सिंग, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.
-
A look at the Playing XI for #MIvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL https://t.co/he3xxIcJOU pic.twitter.com/llXksmuISa
">A look at the Playing XI for #MIvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Live - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL https://t.co/he3xxIcJOU pic.twitter.com/llXksmuISaA look at the Playing XI for #MIvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Live - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL https://t.co/he3xxIcJOU pic.twitter.com/llXksmuISa
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), टिम साऊदी, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा - IPL 2022 Points Table : रविवारीच्या डबल हेडर सामन्यानंतर 'अशी' आहे आयपीएलची गुणतालिका