पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Mumbai Indians vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Mumbai Indians opt to bowl ) घेतला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला आमंत्रित केले आहे.
-
Captain Rohit Sharma wins the toss and #MumbaiIndians will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtE46j57TP
">Captain Rohit Sharma wins the toss and #MumbaiIndians will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Live - https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtE46j57TPCaptain Rohit Sharma wins the toss and #MumbaiIndians will bowl first against #PBKS.
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Live - https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtE46j57TP
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पंधराव्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबई इंडियन्स संघ सध्या चार सामन्यातील पराभवामुळे गुणतालिकेत सर्वात खाली दहाव्या स्थानी आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जचा संघ आपल्या चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
-
A look at the Playing XI for #MIvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL https://t.co/tayy1NGp3R pic.twitter.com/ltWzJETUiH
">A look at the Playing XI for #MIvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL https://t.co/tayy1NGp3R pic.twitter.com/ltWzJETUiHA look at the Playing XI for #MIvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Live - https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL https://t.co/tayy1NGp3R pic.twitter.com/ltWzJETUiH
मुंबई आणि पंजाबचा इतिहास -आतापर्यंत दोन्ही संघात आयपीएलच्या इतिहासात 27 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी 14 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 13 सामन्यात पंजाब किंग्ज संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघात नेहमीच काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. तसेच आज ही तेच पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बेसिल थम्पी.
हेही वाचा - Ambati Rayudu Flying Catch : पंधराव्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल, एकदा बघाच...!