नई दिल्ली : कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी ( Captain Kool Mahendra Singh ) इतका प्रसिद्ध हा आहे, की त्याला क्रिकेट विश्वा संबंधित सर्वच लोक त्याला ओळखतात. परंतु काही असे लोक आहेत की, जे धोनीला त्याच्या जर्सी क्रमांकावरुन ओळखतात. महेंद्र सिंग धोनीच्या जर्सी क्रमांक सात आहे. हे सर्वांना माहित आहे. परंतु धोनी हा सात क्रमांक असलेली जर्सी का वापरतो. याबद्दल आता धोनीने खुलासा ( Mahendra Singh Dhoni revelation ) केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) कर्णधार एमएस धोनीने खुलासा केला आहे की 'नंबर 7' त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. कारण त्याचा जन्म 7 जुलै रोजी झाला होता आणि हा त्याच्या प्रतिष्ठित जर्सीचा क्रमांक आहे. कोणत्याही अंधश्रद्धेमुळे हा क्रमांक ठेवण्यात आला नव्हता. धोनी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून '7' हा शर्ट क्रमांक म्हणून वापरत आहे. गेल्या काही वर्षांत या क्रमांकाची लोकप्रियता अधिकच वाढली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांचा मूळ समूह, इंडिया सिमेंट्सने आयोजित केलेल्या संवादादरम्यान चाहत्यांशी बोलताना, भारताच्या माजी कर्णधाराने क्रमांक 7 ( No. 7 jersey ) का निवडला याबद्दल खुलासा केला आहे. धोनी म्हणाला, सुरुवातीला अनेक लोकांना वाटलं की, 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. सुरुवातीला हे अगदी साधे कारण होते, माझा जन्म 7 जुलै, 1981 रोजी रांची येथे झाला. सातव्या महिन्याचा सातवा दिवस चांगला अंक आहे. मी म्हणालो की मी माझी जन्मतारीख निवडेन.
सीएसके गेल्या आठवड्यापासून IPL 2022 पर्यंत सुरतमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तसेच कर्णधार धोनी या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमुळे खूप खूश आहे. वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यातील लढतीने 26 मार्चपासून आयपीएलच्या 15व्या हंगामाची सुरुवात होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings team ) -
महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), दीपक चहर, मोइन अली, रविंद्र जडेजा, अम्बाती रायडू, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे, रॉबिन उथप्पा, तुषार देशपांडे, केएम आसिफ, राजवर्धन हंगारगेकर, सिमरजीत सिंह, डेवॉन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीशन, क्रिस जॉर्डन, के. भगत वर्मा आणि माहीश तीक्ष्णा.