ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : मिल्नेच्या जागी सीएसकेमध्ये श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाला संधी

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने गुरुवारी चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित हंगामासाठी जखमी अॅडम मिल्नेच्या जागी श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला नियुक्त केले.

Pathirana Milne
Pathirana Milne
author img

By

Published : Apr 21, 2022, 6:15 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात गुरुवारी (21 एप्रिल) होणार आहे. हा सामना डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळला जाईल. तत्पुर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून एक बातमी समोर आली आहे. चेन्नईने घोषणा केली आहे की, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या ( Fast bowler Adam Milne ) जागी आयपीएल 2022 च्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी, त्यांनी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला ( Fast bowler Mathisha Pathirana ) संघात स्थान दिले आहे.

याबाबतची माहिती आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. 26 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केकेआर विरुद्ध सीएकेच्या पहिल्या सामन्यात, अॅडम मिल्नेने 2.3 षटकात एकही विकेट न घेता 19 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याला दुखापत झाली ( Adam Milne was injured ) आणि आयपीएलच्या 2022 मधून तो बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळात 'ज्युनियर लसिथ मलिंगा' ( Junior Lasith Malinga ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथिरानाची अॅक्शन मलिंगा सारखीच आहे. कॅंडीचा 19 वर्षीय तरुम उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे.

तो 2020 आणि 2022 च्या मोसमात श्रीलंकेच्या अंडर-19 विश्वचषक ( Under-19 World Cup ) संघाचा भाग होता. वेस्ट इंडिजमध्ये 2022 च्या अंडर-19 विश्वचषकात, पाथिरानाने चार सामन्यांमध्ये 27.28 च्या सरासरीने आणि 6.16 च्या इकॉनॉमी रेटने सात विकेट घेतल्या होत्या. आता तो 20 लाख रुपये किंमतीवर सीएसकेमध्ये सामील होईल. तसेच तो आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा भाग होणारा श्रीलंकेचा सहावा खेळाडू ठरेल. सीएसकेसाठी पाथीराना हा अनोळखी चेहरा नाही. कारण फ्रँचायझीने त्याची 2021 च्या हंगामात राखीव खेळाडू म्हणून निवड केली होती. त्याने वरिष्ठ क्रिकेट स्तरावर दोन टी-20 आणि एक लिस्ट ए सामना खेळला आहे.

हेही वाचा - Amartya Chakraborty Passes Away: युवा पॅरा स्विमिंग चॅम्पियन अमर्त्य चक्रवर्तीचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.