मुंबई: शुक्रवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 68 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings ) संघात होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात राजस्थाने धोनीच्या बलाढ्य चेन्नईला धूळ चारली होता. तसेच आजचा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्वाचा आहे, तर चेन्नई संघासाठी औपचारिकता असणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली असून चेन्नई नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Chennai Super Kings opt to bat ) घेतला आहे. त्यामुळे राजस्थान प्रथम गोलंदाजी करताना दिसेल.
-
🚨 Toss Update 🚨@msdhoni has won the toss & @ChennaiIPL have elected to bat against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/CspkYigHGj
">🚨 Toss Update 🚨@msdhoni has won the toss & @ChennaiIPL have elected to bat against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/CspkYigHGj🚨 Toss Update 🚨@msdhoni has won the toss & @ChennaiIPL have elected to bat against @rajasthanroyals.
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/CspkYigHGj
आज होणार सामना राजस्थान रॉयल्स संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण या सामन्याच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे की, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर पोहचणार की तिसऱ्या क्रमांकावर राहणार. संजू सॅमसनच्या ( Captain Sanju Samson ) नेतृत्वाखाली राजस्थानने चांगली कामगिरी केली असून संघाने 13 सामन्यात 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे संघ हा आपला वेग कायम ठेऊन टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. चेन्नईने 13 सामन्यांत केवळ चार सामने जिंकले आहेत. अंतिम सामन्यात, चेन्नईला एक युनिट म्हणून कामगिरी करायची आहे आणि त्यांच्या चाहत्यांना थोडा आनंद साजरा करण्याची संधी द्यायची असेल.
-
🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1⃣ change for @rajasthanroyals as Shimron Hetmyer is picked in the team.
1⃣ change for @ChennaiIPL as Ambati Rayudu is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/LauS3OPto7
">🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
1⃣ change for @rajasthanroyals as Shimron Hetmyer is picked in the team.
1⃣ change for @ChennaiIPL as Ambati Rayudu is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/LauS3OPto7🚨 Team News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
1⃣ change for @rajasthanroyals as Shimron Hetmyer is picked in the team.
1⃣ change for @ChennaiIPL as Ambati Rayudu is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/LauS3OPto7
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, एन जगदीसन, एमएस धोनी (कर्णधार), मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना आणि मुकेश चौधरी.
हेही वाचा - Asia Cup Tournament : भारतीय हॉकी संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना