ETV Bharat / sports

IPL 2022 KKR vs LSG : कोलकात्याच्या नाईट रायडर्स समोर आज लखनौच्या सुपरजायंट्सचे आव्हान

author img

By

Published : May 18, 2022, 3:22 PM IST

इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 66 वा सामना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. केएल राहुलचा संघ कोलकात्याविरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनू शकतो. त्याचवेळी श्रेयस अय्यरच्या केकेआरला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

KKR vs LSG
KKR vs LSG

नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 66 वा सामना बुधवारी डॉ. डी.व्हाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता संघाला पराभवा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर आजचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे या संघाचे 16 गुण असून संघ गुणतालिकेत तिसरऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर कोलकाता संघाने ( Kolkata Knight Riders ) देखील 13 पैकी 6 सामन्यात 12 गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे हा संघ सहाव्या स्थानी आहे.

लखनौने त्यांचे शेवटचे दोन सामने गमावले आहेत आणि संघ अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजी हा संघासाठी अडचणीचा भाग ठरला आहे. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक लवकर बाद झाल्याने संपूर्ण बॅटिंग ऑर्डर खराब झाली. तथापि, शेवटच्या साखळी सामन्यात, संघ आपला सर्वोत्तम खेळ देऊ इच्छितो जेणेकरुन त्यांना प्लेऑफपूर्वी लयीत जाता येईल. दीपक हुड्डा चांगली फलंदाजी करत आहे, पण युवा आयुष बडोनीने गेल्या काही सामन्यांमध्ये निराशा केली आहे. गोलंदाजीत संघाकडे अनेक पर्याय आहेत आणि गरज असताना सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे.

आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा असून संघाला आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागणार आहे. केकेआरसाठीही संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी अडचणीची ठरली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाने स्थिर संयोजन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र अजिंक्य रहाणेच्या बाहेर पडल्यानंतर संघाला पुन्हा एकदा सलामीचे संयोजन बदलावे लागणार आहे. आंद्रे रसेलने गेल्या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू खेळ दाखवला होता आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा असेल.

लखनौ सुपर जायंट्स: लोकेश राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंता चमिरा, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर.

कोलकाता नाईट रायडर्स: आरोन फिंच, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.

हेही वाचा - SRH Vs MI: मुंबई इंडियन्स 'प्ले ऑफ'मधून बाहेर.. हैदराबादच्या आशा अजूनही जिवंत.. ३ धावांनी विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.