मुंबई: कोलकाता नाईट राडर्स विरुद्ध पंजाब किंग्स ( KKR vs PBKS ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना खेळला गेला. वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात आंद्रे रसेलने नाबाद 70 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना संघाने बी राजपक्साच्या 31 आणि रबाडाच्या 25 धावांच्या जोरावर 18.2 षटकात सर्वबाद 137 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकाता संघाला विजयसाठी 138 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाने 14.3 षटकांत 4 गडी गमावून 141 धावा करत पूर्ण केले.
-
It's raining boundaries at the Wankhede.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/2V8wd8mpZ9
">It's raining boundaries at the Wankhede.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/2V8wd8mpZ9It's raining boundaries at the Wankhede.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/2V8wd8mpZ9
138 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलकाता संघाला पहिला धक्का सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या रुपाने बसला. अजिंक्य रहाणेने 11 चेंडूंचा सामना करताना तीन चौकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने या 12 धावा करताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील चार हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तो आयपीएल स्पर्धेत चार हजार धावा करणारा 12 वा खेळाडू ठरला आहे. त्याने हा कारनामा फक्त 144 डावांमध्ये केला आहे.
-
Milestone 🚨 - 4000 and counting for @ajinkyarahane88 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He is the the 12th batter to score 4k runs in #TATAIPL
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Myd0O7S9hp
">Milestone 🚨 - 4000 and counting for @ajinkyarahane88 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
He is the the 12th batter to score 4k runs in #TATAIPL
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Myd0O7S9hpMilestone 🚨 - 4000 and counting for @ajinkyarahane88 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
He is the the 12th batter to score 4k runs in #TATAIPL
Live - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Myd0O7S9hp
दरम्यान दुसरा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (3), श्रेयस अय्यर (26) आणि नितेश राणा (0) जलद बाद झाले. त्यामुळे कोलकाता संघाची धावसंख्या 6 षटकानंतर 4 बाद 51 झाली. आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्सने पाचव्या विकेट्साठी नाबाद 90 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये आंद्रे रसेलने 70 आणि सॅम बिलिंग्सने 24 धावांची नाबाद खेळी केली. पंजाबकडून राहुल चहरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तसेच रबाडा आणि स्मिथने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) पहिल्याच षटकांत (1) बाद झाला. त्यानंतर या संघाने आपला डाव सावरताना, पावरप्लेच्या षटकात 3 बाद 62 धावा केल्या होत्या. मात्र तरी देखील या संघाने आपल्या विकेट्स सातत्याने गमावल्या. या संघाकडून सर्वाधिक धावा राजपक्सा आणि रबाडाने केल्या. राजपक्साने 9 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार लगावत 31 धावांची वादळी केली.
-
Innings Break!@y_umesh leads the charge with the ball as #PBKS are bowled out for 137 in 18.2 overs 👏 👏#KKR chase to begin shortly.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/tLLPAAKXKv
">Innings Break!@y_umesh leads the charge with the ball as #PBKS are bowled out for 137 in 18.2 overs 👏 👏#KKR chase to begin shortly.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
Scorecard - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/tLLPAAKXKvInnings Break!@y_umesh leads the charge with the ball as #PBKS are bowled out for 137 in 18.2 overs 👏 👏#KKR chase to begin shortly.
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
Scorecard - https://t.co/lO2arKbxgf #KKRvPBKS #TATAIPL pic.twitter.com/tLLPAAKXKv
त्याच्यानंतर रबाडाने 16 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 25 धावा केल्या. त्यानंतर कोणत्याच फलंदाजाल 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे त्यांना 18.2 षटकात सर्वबाद 137 धावा करता आल्या. कोलकाता संगाकडून गोलंदाजी करताना सलग तिसऱ्या सामन्यात उमेश यादवने भेदक गोलंदाजीने ( Umesh Yadav's penetrating bowling ) विरोधी संघाच्या फलंदाजीची वाताहत केली आहे. त्याने आपल्या चार षटकांत 23 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर साउदीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मावी, नरीन आणि रसेलने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा - Maxwell & Vini Marriage: आता तमिळ रितीरिवाजांनुसार मॅक्सवेलने केले लग्न; हाल घालून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल