ETV Bharat / sports

IPL 2022 KKR vs PBKS: कोलकाता नाइट रायडर्सला आज पंजाबच्या किंग्सचे आव्हान; दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघात रस्सीखेच - मराठी बातम्या

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 8 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) आणि पंजाब किंग्स ( Punjab Kings ) हे संघ शुक्रवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे आणि सामन्याला सुरुवात संध्याकाळी 7.30 वाजता होईल.

KKR vs PBKS:
KKR vs PBKS:
author img

By

Published : Apr 1, 2022, 3:57 PM IST

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Kolkata Knight Riders vs Punjab Kings ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा संघ मंयक अग्रवालच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. हा सामना पंजाबचा दुसरा, तर कोलकाता संघाचा तिसरा सामना आहे.

सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा - पंजाब किंग्जने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली असून संघाला त्यांच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण पहिल्याच सामन्यात त्याला 200 हून अधिक धावांनी दिल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ( Bowler Kagiso Rabada ) तीन दिवसांच्या क्वारंटार्ईननंतर खेळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाला चालना मिळेल. वानखेडेच्या खेळपट्टीवर केवळ दोनच सामने झाले असून ते पाहता फलंदाजी सोपी राहिलेली नाही, असे दिसते. दोन महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या आयपीएलसाठी आताच सुरुवात झाली आहे, पण नाणेफेक आधीच सामन्याच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कारण सामन्याच्या दुसऱ्या डावात दवांचा प्रभाव पडत आहे.

राणाने सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे - कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि आक्रमक व्यंकटेश अय्यर हे आरसीबीविरुद्ध स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे आता हे दोघेही संघाला दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. कर्णधार श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) आरसीबीविरुद्ध अपयशी ठरला असला, तरी तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. पण त्याला नितीश राणांसारख्या इतर सहकार्यांची साथ लागेल. डावखुरा फलंदाज नितेश राणाला सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दोघांशिवाय मधल्या फळीची जबाबदारी सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन आणि बिग हिटर आंद्रे रसेल यांच्या खांद्यावर असेल. केकेआरच्या मधल्या फळीमध्ये असे फलंदाज आहेत, जे कोणत्याही आक्रमणाला कलाटणी देऊ शकतात. संघ व्यवस्थापनाला आशा आहे की, ते सर्व पंजाबविरुद्ध एकजुटीने कामगिरी करतील. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन्ही सामन्यांमध्ये नवीन चेंडूसह चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदीलाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.

राज बावाला आणखी संधी मिळणार का - कोलकाता संघासाठी चिंतेचा विषय असेल तो फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा फॉर्म, त्याला लवकरच पुनरागमन करावे लागणार आहे. पंजाबसाठी, कर्णधार मयंक अग्रवाल, शिखर धवन आणि श्रीलंकेचा भानुका राजपक्षे या प्रमुख तीन खेळाडूंवर बरेच काही अवलंबून असेल. राजपक्षे यांनी आरसीबीविरुद्ध मॅच विनिंग इनिंग खेळली होती. मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे ( PBKS Head Coach Anil Kumble ) यांना, तथापि, ओडियन स्मिथ आणि शाहरुख खान यांनी आकसीबी विरुद्ध त्यांच्या बाजूने धावा करून त्यांची योग्यता सिद्ध केल्यामुळे मधल्या फळीकडून अधिक योगदान देण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत अंडर-19 विश्वचषकातील स्टार राज बावाला आणखी संधी मिळणार की नाही हे पाहावे लागेल. कारण तो आयपीएल पदार्पणात अपयशी ठरला होता.पंजाबचे गोलंदाज संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंग यांना केकेआरविरुद्धच्या सामन्यात सुधारणा करावी लागणार आहे. राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार या फिरकी जोडीची आठ षटकेही सामन्यात खुप मोठा फरक पाडू शकतात.

कोलकाता नाईट रायडर्स : अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.

पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

हेही वाचा - IPL 2022 LSG vs CSK: पराभवाचे वारे! लखनऊ सुपर जायंट्सचा चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.