ETV Bharat / sports

IPL 2022 Latest Upadates : जसप्रीत बुमराह आणि नितीश राणावर बीसीसीआयची मोठी कारवाई; जाणून घ्या, काय आहे प्रकरण

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा, हे पुण्यातील MCA स्टेडियमवर आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि नितीश राणा यांना मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

KKR VS MI
KKR VS MI
author img

By

Published : Apr 7, 2022, 4:30 PM IST

पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदावा सामना बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने मुंबईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. यानंतर बीसीसीआयने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहवर ( Jaspreet Bumrah ) आणि केकेआरच्या नितेश राणावर ( Nitesh Rana ) मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन ( Violation of IPL Code of Conduct ) केल्याबद्दल फटकारून दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाला पुण्यातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या संघाच्या सामन्यादरम्यान टाटा इंडियन प्रीमियर लीग ( Tata Indian Premier League ) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. तसेच त्याच्या मॅच फीपैकी 10 टक्के दंड ( Penalty of 10% of match fee ) आकारण्यात आला आहे.

आयपीएलच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, राणा आणि जसप्रीत बुमराह यांनी आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 चा गुन्हा स्वीकारला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ( Maharashtra Cricket Association Stadium ) बुधवारी झालेल्या आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.

हेही वाचा - Kkr Vs Mi Ipl 2022 : सलग तिसरा पराभव! कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.