ETV Bharat / sports

IPL 2022 GT vs CSK : नाणेफेक जिंकून गुजरातचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हार्दिक पांड्याच्या जागी 'या' खेळाडूला संधी - Ravindra Jadeja

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील 29 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( GT vs CSK ) संघात संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक पार पडली असून गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ( Gujarat Titans opt to bowl ) निर्णय घेतला आहे.

GT vs CSK
GT vs CSK
author img

By

Published : Apr 17, 2022, 7:24 PM IST

Updated : Apr 17, 2022, 10:12 PM IST

पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 29 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) यांच्यात पार पडणार आहे. या सामन्याला पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खान यांच्यात नाणेफेक पार पडली. राशिद खानने ( Rashid Khan ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे राशिद खान नेतृत्व करत आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पहिल्यांदाच खेळला जात आहे. कारण गुजरात टायटन्स संघाने यंदाच आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंत कामगिरी पाहिली, तर दोन्ही संघात खुप फरक आहे. दोन्ही संघानी देखील यंदाच्या हंगामातील प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने ( Chennai Super Kings Team ) आपल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत दोन गुणांसह 9 व्या स्थानी विराजमान आहे. गुजरात टायटन्सबद्दल ( Gujarat Titans ) बोलायचे, तर या संघाने आतपर्यंत पाचपैकी फक्त एक सामना गमावला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश थेक्षाना आणि मुकेश चौधरी.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान (कर्णधार), अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.

हेही वाचा - IPL 2022 PBKS vs SRH: लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचे हैदराबादला 152 धावांचे लक्ष्य

Last Updated : Apr 17, 2022, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.