मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 40 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी मुंबईतील वानखेडेवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर मागील सामन्यात हैदराबाद संघाने गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे या दोन संघात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लीगमधील एकमेव पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर, सलग पाच सामने जिंकणाऱ्या हैदराबादला गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी आपली प्रभावी गती कायम ठेवावी लागेल. या संघाने सात सामन्यात दोन पराभव आणि पाच विजयासह गुणतालिकेत 10 गुणांची नोंद करुन दुसरे स्थान पटकावले आहे. या दोन संघांच्या वेगवान गोलंदाजांमध्ये जोरदार लढत होणार आहे. हैदराबादचा युवा भारतीय गोलंदाज उमरान मलिक गुजरातच्या लॉकी फर्ग्युसनच्या 150 किमी प्रतितासच्या वेगाला जवळपास त्याच वेगाने उत्तर देईल.
-
Round 2, tonight!!🔥#SeasonOfFirsts #AavaDe #GTvSRH pic.twitter.com/5qvlNzmGIg
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Round 2, tonight!!🔥#SeasonOfFirsts #AavaDe #GTvSRH pic.twitter.com/5qvlNzmGIg
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 27, 2022Round 2, tonight!!🔥#SeasonOfFirsts #AavaDe #GTvSRH pic.twitter.com/5qvlNzmGIg
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 27, 2022
या बाबतीत मात्र हैदराबादचे पारडे जड दिसत आहे. ज्याने त्यांच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अवघ्या 68 धावांत गुंडाळला होता. संघाचे चार वेगवान गोलंदाज उत्तम लयीत आहेत आणि सर्वजण एकमेकांपेक्षा वेगळ्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेचा युवा मार्को यानसेन (पाच सामन्यात 6 बळी) चेंडूला उसळी घेऊन स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याच वेळी उमरान ( Fast bowler Umran Malik ) (सात सामन्यात 10 बळी) वेगवान आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजन (सात सामन्यात १५ विकेट) आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार (सात सामन्यात नऊ विकेट) हे देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
हार्दिक (सहा सामन्यात 295 धावा) कर्णधारपदाच्या जबाबदारीसह संघाच्या फलंदाजीचा भारही वाहतो आहे. त्याला डेव्हिड मिलरची (सात सामन्यात 220 धावा) चांगली साथ लाभली आहे. मात्र फिनिशरच्या भूमिकेत अभिनव मनोहर आणि राहुल तेवतिया यांना फलंदाजीत सातत्य आणावे लागेल. हैदराबादसाठी, अभिषेक शर्मा (सात सामन्यात 220 धावा) आणि राहुल त्रिपाठी (सात सामन्यात 212 धावा) या युवा भारतीय फलंदाजांची कामगिरी ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. कर्णधार केन विल्यमसन ( Kane Williamson ), एडन मारक्रम आणि यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांनीही चांगली कामगिरी केली आहे.
-
Wankhede ahoy. 🏟️
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Before we play our 1️⃣st match of this season there, here's a lowdown of the iconic ground. 📋#GTvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/aRsuL44VTR
">Wankhede ahoy. 🏟️
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2022
Before we play our 1️⃣st match of this season there, here's a lowdown of the iconic ground. 📋#GTvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/aRsuL44VTRWankhede ahoy. 🏟️
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2022
Before we play our 1️⃣st match of this season there, here's a lowdown of the iconic ground. 📋#GTvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/aRsuL44VTR
सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमेरो शेफर्ड, मार्को यान्सन, जे सुचित , श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, शॉन अॅबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डॉमिनिक ड्रेक्स, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ , प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, वरुण आरोन आणि बिसाई सुदर्शन.
हेही वाचा - Ipl 2022 Rr Vs Rcb : सामना संपल्यानंतर रियान परागशी हस्तांदोलन करण्यास हर्षल पटेलने का दिला नकार?