अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाचा थरार शेवटच्या दिवसावर येऊन ठेपला आहे. कारण आज म्हणजे रविवारी (29 मे) आयपीएल 2022 मधील फायनल सामना ( IPL 2022 FINAL Match ) खेळला जाणार आहे. हा सामना आयपीएलच्या पहिल्या हंगामातील विजेता राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिल्याच हंगामात आणि प्रथमच फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल समापन समारोपानंतर ( IPL 2022 Closing Ceremony ) संध्याकाळी ठीक आठला सुरुवात होणार आहे.
-
Guess why the streets will be empty at 8 pm tonight? No prizes for guessing this 😉 #IPLFinal #AavaDe #SeasonOfFirsts pic.twitter.com/icN6nF1VOK
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Guess why the streets will be empty at 8 pm tonight? No prizes for guessing this 😉 #IPLFinal #AavaDe #SeasonOfFirsts pic.twitter.com/icN6nF1VOK
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022Guess why the streets will be empty at 8 pm tonight? No prizes for guessing this 😉 #IPLFinal #AavaDe #SeasonOfFirsts pic.twitter.com/icN6nF1VOK
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने ( Gujarat Titans Team ) लीग स्टेज शानदार प्रदर्शन सर्वांना आपल्या पहिल्याच हंगामात चकित केले. गुजरात टायटन्सने साखळी फेरीतील 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. त्यामुळे या संघाने 20 गुणांसह प्लेऑफमध्ये सर्वात प्रथम धडक देताना टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. त्यानंतर आपल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात डेव्हिड मिलरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, राजस्थान रॉयल्स संघाला 7 विकेट्सने नमवत फायनलमध्ये दणक्यात एंट्री मारली. आतापर्यंतच्या अप्रतिम कामगिरीचा अनुभव फायनल सामन्यात झोकून हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) नेतृत्वाखालील, आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज असणार आहेत.
-
Our Titans, on and off the field 🤩#SeasonOfFirsts #AavaDe #MatchDay #IPLFinal pic.twitter.com/AmKb1O3o7g
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Our Titans, on and off the field 🤩#SeasonOfFirsts #AavaDe #MatchDay #IPLFinal pic.twitter.com/AmKb1O3o7g
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022Our Titans, on and off the field 🤩#SeasonOfFirsts #AavaDe #MatchDay #IPLFinal pic.twitter.com/AmKb1O3o7g
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
पहिल्या हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals Team ) आपल्या पहिल्या विजेतेपदानंतर, तेरा वर्षे काही खास कामगिरी करता आली नव्हती. परंतु आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापासून फ्रँचायझींने संघाची मोट चांगली बांधली. त्यानंतर युवा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने बहारदार प्रदर्शन केले. त्यामुळे संघाने साखळी फेरीतील 14 सामन्यात 9 सामने जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश करताना टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केले. ज्यामुळे संघाला त्याचा क्वालिफायर 2 मध्य पोहचण्यासाठी फायदा झाला.
-
The Class of 2022 - one last time this season. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #HallaBol | #दिलसेरॉयल pic.twitter.com/6odC8npg0g
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Class of 2022 - one last time this season. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #HallaBol | #दिलसेरॉयल pic.twitter.com/6odC8npg0g
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022The Class of 2022 - one last time this season. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #HallaBol | #दिलसेरॉयल pic.twitter.com/6odC8npg0g
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
या संघाने पहिला क्वालिफायर-1 सामना देखील गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये या संघाला पराभूत व्हावे लागले आणि फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. परंतु संघ टॉप 2 मध्ये असल्याचा फायदा त्यांना झाला आणि क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळाली. या संधीच सोनं करताना राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 7 विकेट्सने पराभव केले. तसेच मोठ्या थाटात प्रवेश केला. त्याचबरोबर आज गुजरात टायटन्सला पराभूत करून 14 वर्षांनतर पुन्हा एकदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याचे संजू सेनेचे ( Captain Sanju Samson ) स्वप्न असणार आहे.
-
This dream is a work in progress. 😍
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
See you tonight. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #GTvRR pic.twitter.com/L3W1PS9VkH
">This dream is a work in progress. 😍
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
See you tonight. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #GTvRR pic.twitter.com/L3W1PS9VkHThis dream is a work in progress. 😍
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
See you tonight. 💗#RoyalsFamily | #IPLFinal | #GTvRR pic.twitter.com/L3W1PS9VkH
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे -
गुजरात टायटन्स संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, आर.के. साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, अभिनव मनोहर, नूर अहमद, डॉमिनिक ड्रेक, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, प्रदीप सांगवान, बी. साई सुदर्शन, गुरकीरत सिंग मान आणि वरुण आरोन.
राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद सिंग मॅककोय, जेम्स अनू. नीशम, कॉर्बिन बॉश, कुलदीप सेन, करुण नायर, रॉसी व्हॅन डर डसेन, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव आणि शुभम गढवाल.