ETV Bharat / sports

IPL 2022 Eliminator LSG vs RCB : नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन - sports news

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला ईडन गार्डन्सवर सुरुवात होणार आहे. नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

LSG vs RCB
LSG vs RCB
author img

By

Published : May 25, 2022, 8:15 PM IST

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील एलिमेनेटर सामना बुधवारी (25 मे) ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( RCB vs LSG ) संघात पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाची धुरा फाफ डु प्लेसिस आणि केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे. पावसामुले एक तास उशिराने दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा ( Lucknow Super Giants opt to bowl )निर्णय घेतला आहे.

लखनौ संघाने ( Lucknow Super Giants ) साखळी फेरीत 14 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांना दिल्लीच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली. लखनौचा संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय नोंदवत प्लेऑफमध्ये पोहोचला. या सामन्यात संघाच्या गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( Royal Challengers Bangalore ) फलंदाजी मजबूत आहे आणि लखनौला विजय नोंदवायचा असेल तर त्यांच्या फलंदाजीला रोखावे लागेल. आरसीबीच्या संघात उजव्या हाताचे अनेक फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत डावखुरा गोलंदाज असलेल्या मोहसीन खानची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळेल. तर पराभूत संघ बाहेर होईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. त्याचबरोबर विजेता संघ क्वालिफायर दोन मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना करेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, मोहसीन खान, आवेश खान, दुष्मंथा चमीरा आणि रवी बिश्नोई.

हेही वाचा - Chessball Masters Final : प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत मारली धडक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.