मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 सामना शुक्रवारी (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Delhi Capitals vs Rajasthan Royals ) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला आता कोरोनाचा फटका बसला आहे. वास्तविक, मिचेल मार्शसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या एकूण सहा रुग्ण आढळले आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वीच एक प्रकरण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात ( DC vs RR Match Venue Change ) आले आहे.
-
🚨 NEWS 🚨: Wankhede Stadium to host Delhi Capitals versus Rajasthan Royals on April 22. #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Match No. 32 involving Delhi Capitals and Punjab Kings scheduled today at Brabourne – CCI will go ahead as per the schedule.
More Details 🔽https://t.co/dlkJjGhguC
">🚨 NEWS 🚨: Wankhede Stadium to host Delhi Capitals versus Rajasthan Royals on April 22. #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Match No. 32 involving Delhi Capitals and Punjab Kings scheduled today at Brabourne – CCI will go ahead as per the schedule.
More Details 🔽https://t.co/dlkJjGhguC🚨 NEWS 🚨: Wankhede Stadium to host Delhi Capitals versus Rajasthan Royals on April 22. #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Match No. 32 involving Delhi Capitals and Punjab Kings scheduled today at Brabourne – CCI will go ahead as per the schedule.
More Details 🔽https://t.co/dlkJjGhguC
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता, मात्र आता हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाणही बदलण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यामुळे, प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाची लागण झालेला सहावा खेळाडू टीम सिफर्ट ( Team Sifert ) आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक नियमितपणे मार्शच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्याशिवाय चार सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही कोरोना झाला होता, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली होती.
-
🚨UPDATE: Our game against the @DelhiCapitals will now be played at the Wankhede Stadium in Mumbai instead of Pune on 22nd April at 7.30 PM IST. pic.twitter.com/EMW1iese61
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🚨UPDATE: Our game against the @DelhiCapitals will now be played at the Wankhede Stadium in Mumbai instead of Pune on 22nd April at 7.30 PM IST. pic.twitter.com/EMW1iese61
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 20, 2022🚨UPDATE: Our game against the @DelhiCapitals will now be played at the Wankhede Stadium in Mumbai instead of Pune on 22nd April at 7.30 PM IST. pic.twitter.com/EMW1iese61
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 20, 2022
यापूर्वी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते, तेव्हा टीमला पुण्याला जाऊ दिले नाही. या टीमला मुंबईतील हॉटेलमध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. कोरोना प्रकरणांमुळे, बीसीसीआयने पुन्हा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पुण्याऐवजी 20 एप्रिल रोजी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा - Photo Gallery : कोण आहे तेलुगू अभिनेत्री प्रियांका, जिच्यासोबत व्यंकटेश अय्यरच्या अफेअरची आहे चर्चा