मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. हा सामना अगोदर पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा सामना मुंबईला हलवण्यात आला. दोन्ही संघातील यंदाच्या हंगामातील हा पहिलाच सामना आहे.
-
Sanju’s 100th Royals match 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Kul-Cha 🍿
Buttler vs Warner 🔥
📰 Don’t just wait. Read the #DCvRR preview. 😍 👇
">Sanju’s 100th Royals match 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
Kul-Cha 🍿
Buttler vs Warner 🔥
📰 Don’t just wait. Read the #DCvRR preview. 😍 👇Sanju’s 100th Royals match 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2022
Kul-Cha 🍿
Buttler vs Warner 🔥
📰 Don’t just wait. Read the #DCvRR preview. 😍 👇
राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत या हंगामात सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे आठ गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील सहा सामने खेळले असून तीन विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात सहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तसेच दोन्ही संघानी देखील आपल्या मागील सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. ज्यामध्ये दिल्लीने पंजाबचा तर राजस्थानने कोलकात्याचा पराभव करत विजय संपादन केले आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, या संघातील खेळाडूंनी दोन्ही विभागात शानदार प्रदर्शन केले आहे. जोस बटलरची ( Jose Butler ) बॅट सध्या आग ओकत आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) फिरकीसमोर विरोधी संघातील फलंदाज हतबल दिसत आहेत. तेच चित्र दिल्ली कॅपिटल्स संघाचे आहे, कारण कुलदीप यादव सातत्याने आपल्या संघासाठी विकेट्स घेत आहे. त्याचबरोबर डेव्हिड वार्नर ( David Warner ) देखील प्रत्येक सामन्यात आपल्या खेळीत सातत्य ठेवून आहे. त्यामुळे या दोन संघात नक्कीच काट्याची टक्कर होईल यात शंकाच नाही.
-
Your #DCvRR Gameday Programme is here 🗞️
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Get up to speed for the perfect Friday plan with all the factoids you need to know before our Royal clash 🤩🏟️#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/QCw06aFysu
">Your #DCvRR Gameday Programme is here 🗞️
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
Get up to speed for the perfect Friday plan with all the factoids you need to know before our Royal clash 🤩🏟️#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/QCw06aFysuYour #DCvRR Gameday Programme is here 🗞️
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
Get up to speed for the perfect Friday plan with all the factoids you need to know before our Royal clash 🤩🏟️#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/QCw06aFysu
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील हेड टू हेड -
1. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत, त्यापैकी डीसीने 12 आणि आरआरने 12 वेळा विजय मिळवला आहे.
2. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 300 धावा केल्या आहेत.
3. दिल्लीविरुद्ध राजस्थानच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 234 धावा केल्या आहेत.
4. दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सात विकेट घेतल्या आहेत.
5. राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील असलेला ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 विकेट घेतल्या आहेत.
राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोस बटलर (डब्ल्यूके), शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणीक कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, रॉसी वॅन डर नेस, जेम्स वॅन डरसेन , डॅरिल मिशेल, करुण नायर, ओबेद मॅकॉय, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, शुभम गढवाल, ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, खलील अहमद, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, ललित यादव, सर्फराज खान, अश्विन हेब्बर, मनदीप सिंग, एनरिक नॉर्टजे , चेतन साकारिया, लुंगी एनगिडी, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, टिम सेफर्ट, प्रवीण दुबे, रिपल पटेल, विकी ओस्तवाल, यश धुल आणि केएस भरत.
हेही वाचा - MI vs CSK : माहीची फटकेबाजी! मुंबई इंडियन्सवर चेन्नई सुपर किंग्जचा दणदणीत विजय