मुंबई: मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 41 वा सामना गुरुवारी (28 एप्रिल) वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसातला सुरु होईल. या हंगामतील या दोन संघांचा दुसरा सामना आहे. या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ( Captain Shreyas iyer ) कोलकाता बदला घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
-
Boys taiyaar hai 🔥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Drop a good luck message for them below 👇🏻#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvKKR | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @octamarkets pic.twitter.com/d7tri21t40
">Boys taiyaar hai 🔥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
Drop a good luck message for them below 👇🏻#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvKKR | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @octamarkets pic.twitter.com/d7tri21t40Boys taiyaar hai 🔥
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
Drop a good luck message for them below 👇🏻#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvKKR | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @octamarkets pic.twitter.com/d7tri21t40
कोलकाता नाईट रायडर्स संघाने ( Kolkata Knight Riders Team ) या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात पराभव, तर तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात पराभव आणि तीन सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह सातव्या स्थानी आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टु हेड -
1. दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 16 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे.
2. गेल्या मोसमात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले. यादरम्यान केकेआरने दोनदा, तर डीसीने एक सामना जिंकला. त्याच वेळी, या हंगामात एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केकेआरचा पराभव केला आहे.
3. नितीश राणाने केकेआरकडून दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 312 धावा केल्या आहेत.
4. केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक 392 धावा केल्या आहेत.
5. सुनील नरेनने आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध केकेआरकडून सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या आहेत.
6. दिल्ली कॅपिटल्ससाठी केकेआर विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या होत्या.
कोलकाता नाईट रायडर्स: आरोन फिंच, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथमसिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊथी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.
दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी सौव, रोवमन पॉवेल, अॅनरिक नोर्किया, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी , ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत आणि टिम सेफर्ट.
हेही वाचा - GT vs SRH : गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवर पाच गडी राखून विजय