मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या मोसमाचा 32 वा सामना बुधवारी (20 एप्रिल) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघांचे कर्णधार मयंक अग्रवाल ( Mayank Agarwal ) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant ) यांच्यात पार पडली आहे. रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला साडेसातला सुरुवात होईल.
-
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/i7EttsbTlp
">🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/i7EttsbTlp🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/i7EttsbTlp
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधार मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) खेळू शकला नव्हता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. परंतु आज होणाऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केले आहे. त्याच्या गैरहजेरीत मागील सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
-
A look at the Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/cm7PboEKqI
">A look at the Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/cm7PboEKqIA look at the Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/cm7PboEKqI
दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ ( Punjab Kings Team ) सहा सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवामुळे सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद.
हेही वाचा - IPL 2022 Updates : फॉर्म बिघडलेल्या विराटला रवी शास्त्रींचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...