मुंबई: गुरुवारी झालेल्या आयपीएल 2022 च्या 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals ) कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघावर चार विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने ( Captain Rishabh Pant ) केकेआरविरुद्धच्या ( KKR ) सामन्यातील विजय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. पंतने या सामन्यातील विजयाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. याशिवाय सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
-
A return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0P
">A return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0PA return to winning ways for the Delhi Capitals! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
The Rishabh Pant-led side beat #KKR by 4 wickets & seal their 4⃣th win of the #TATAIPL 2022. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR pic.twitter.com/QCQ4XrJn0P
प्रथम पलंदाजी करताना कोलकाता संघाने 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 150 धावा करत विजय मिळवला. कुलदीप यादवने फक्त तीन षटके गोलंदाजी करताना केकेआरच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला केकेआरवर वर्चस्व निर्माण करता आले. त्यामुळे केकेआर दुसऱ्यांदा डीसीकडून पराभव स्वीकारला. कुलदीप यादवने ( Spinner Kuldeep Yadav ) 4 बळी घेतल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
-
.@imkuldeep18 scalped 4⃣ wickets and bagged the Player of the Match award as Delhi Capitals beat #KKR. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/Qeqy4ggRW0
">.@imkuldeep18 scalped 4⃣ wickets and bagged the Player of the Match award as Delhi Capitals beat #KKR. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/Qeqy4ggRW0.@imkuldeep18 scalped 4⃣ wickets and bagged the Player of the Match award as Delhi Capitals beat #KKR. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/Qeqy4ggRW0
दिल्लीचा सामन्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार ऋषभ पंत ( Captain Rishabh Pant ) म्हणाला की, आम्ही मध्यभागी खूप विकेट गमावल्या, पण त्याच वेळी आम्ही विचार केला की जर आम्ही खेळ शेवटपर्यंत घेऊन गेलो तर आम्ही जिंकू शकतो. मार्श संघात परत आल्याने चांगले झाले आहे. आम्ही याबद्दल (सर्वोत्तम इलेव्हन म्हणून) शंभर टक्के विचार केलेला नाही. खलीलला दुखापत झाली आणि तो परत आला की आमच्याकडे आमची सर्वोत्तम इलेव्हन असेल.
कर्णधार ऋषभ पंत पुढे म्हणाला की, मी नेटमध्ये खूप धावा करतो. आम्ही त्याला (पॉवेल) एक फिनिशर म्हणून पाहतो, पण जर आजच्या प्रमाणे पुढे जाऊन खूप विकेट गमावल्या तर त्याला पुढे येऊन काम करावे लागेल. आम्ही पॉइंट टेबलचा विचार करत नाही आणि एकावेळी एकच सामना विचारात घेत आहोत. आम्हाला आमच्या योजनांबाबत अधिक स्पष्ट असले पाहिजे आणि आम्ही त्यात सुधारणा करू शकतो. मला वाटले की, मी त्याला (कुलदीपला) त्याचे शेवटचे षटक दुसऱ्या टोकाकडून देऊ पण नंतर चेंडू ओला होत गेला आणि मलाही वेग बदलायचा होता, म्हणून मी वेगवान गोलंदाज आणले. पण ते कामी आले नाही.