ETV Bharat / sports

IPL 2022: आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 6 एप्रिलपासून 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार

आयपीएलच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामात चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 6 एप्रिलपासून 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या संघांचे सामने स्टेडियमध्ये बसून पाहता येणार आहेत.

IPL
IPL
author img

By

Published : Apr 1, 2022, 8:10 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी तेव्हा पासून आजपर्यंतच्या सामन्यांसाठी, स्टेडियमच्या एकूण आसन क्षमतेच्या फक्त 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात आली होती. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता 25 टक्क्याऐवजी 50 टक्के प्रेक्षकांना ( 50 percent audience allowed ) आयपीएलचे सामने स्टेडियमध्ये जाऊन पाहता येणार आहेत. याबाबतची माहिती बुक माय शो ( Book My Show ) या आयपीएलच्या अधिकृत तिकीट पार्टनरने शुक्रवारी दिली आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे सर्व लीग सामने महाराष्ट्रात ( All league matches in Maharashtra ) होत आहे. आता या सामन्यांना चाहते जास्त प्रमाणात हजेरी लावू शकतात. कारण आयपीएल 2022 चा अधिकृत तिकीट पार्टनर बुक माय शोने, 50 टक्के चाहत्यांच्या उपस्थिला परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने 2 एप्रिलपासून सर्व कोविड-19 निर्बंध हटवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांना आता मुंबई आणि पुण्यातील स्टेडियमवर जाऊन सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. या अगोदर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम या सर्व स्टेडियममध्ये केवळ 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.

तिकीट पार्टनरने आपल्या अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे की, "सामन्यांसाठी तिकिटांची विक्री ऑनलाइन उपलब्ध आहे. कारण बीसीसीआयने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या संख्येत 50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी ते 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित होते. तिकीट साइटने असेही घोषित केले आहे की, आयपीएल 2022 च्या सामन्यांची फेज 2 ची विक्री त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर थेट होईल. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 6 एप्रिल रोजी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स ( Kolkata Knight Riders and Mumbai Indians ) यांच्यातील सामन्यासाठी चाहत्यांना आता तिकीट काढता येणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( Board of Control for Cricket in India ) 23 मार्च रोजी सांगितले होते की, आयपीएल 2022 च्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सलामीच्या सामन्यापासून स्टेडियममध्ये चाहत्यांचे स्वागत करेल.

हेही वाचा - Ipl 2022 Kkr Vs Pbks: नाणेफेक जिंकून कोलकाता संघाचा गोलंदाजीचा निर्णय; अशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.