ETV Bharat / sports

IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाचा मोठा निर्णय; मार्क वुडच्या जागी संघात अँड्र्यू टायचा समावेश - क्रिकेटच्या मराठी बातम्या

लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow super giants ) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी दुखापतग्रस्त इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या जागी अँड्र्यू टायचा समावेश केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटीदरम्यान वुडच्या कोपराला दुखापत झाली होती.

Andrew Tie
Andrew Tie
author img

By

Published : Mar 24, 2022, 1:00 PM IST

मुंबई: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. या अगोदर लखनौ सुपर जायंट्स संघाने मोठा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी मार्क वुडच्या जागी घेण्याची नवीन खेळाडू घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी मार्क वुडच्या जागी अँड्र्यू टायचा ( Andrew Tie replaces Mark Wood ) संघात समावेश केला आहे. या हंगामासाठी वुडला लखनौने 7.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

  • 🚨 NEWS 🚨: Andrew Tye joins Lucknow Super Giants as a replacement for injured Mark Wood. #TATAIPL

    More Details 🔽

    — IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या सीझनपूर्वी मार्क वुडला दुखापत ( Injury to Mark Wood ) झाली होती. त्यामुळे त्याने संपूर्ण मोसमातून माघार घेतली आहे. मार्क वुडच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाच्या व्यवस्थापनाने वुडच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायचा समावेश केला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूड जखमी झाला होता. त्याच्या कोपराला दुखापत झाली होती, त्यानंतर तो बरा होऊ शकला नाही. लखनौ सुपर जायंट्सला ( Lucknow super giants ) या मोसमापूर्वी तो बरा होईल अशी आशा होती. पण हे होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत संघाने अँड्र्यू टायचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश केला आहे. अँड्र्यू याआधीही आयपीएलमध्ये खेळला आहे. तो पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स संघाचा भाग राहिला आहे.

अँड्र्यूने ऑस्ट्रेलियासाठी टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 47 विकेट घेतल्या आहेत. तर सात एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. टायने 27 आयपीएल सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. या मोसमापूर्वी तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्याने अनेक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.