ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs LSG : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - KL Rahul

आज सुपर संडेमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 37 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.सामन्याला साडेसातला सुरुवात होईल.

MI vs LSG
MI vs LSG
author img

By

Published : Apr 24, 2022, 7:28 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 37 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Mumbai Indians opt to bowl ) घेतला आहे. त्याचबरोबर लखनौ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ( Mumbai Indians Team ) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सात सामने खेळले आहेत. या सात ही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) देखील सात सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे 8 गुण आहेत. तसेच हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या सामन्यात आतापर्यंतच्या कामगिरीनुसार लखनौ संघाचे पारडे मुंबईपेक्षा जड दिसत आहे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), मनीष पांडे, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ आणि जसप्रीत बुमराह.

हेही वाचा - Sachin Tendulkar 49th Birthday : 49 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.