दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला आजपासून यूएईत सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने दुसऱ्या सत्राचा प्रारंभ होईल. उभय संघातील सामन्याला सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटानी सुरूवात होईल.
आयपीएल 2021च्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्सचा संघ 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स 7 पैकी 4 विजय मिळवत 8 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. दोन्ही संघ दुसऱ्या सत्राचा शुभारंभ विजयाने करण्यासाठी उत्सुक आहेत.
मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत. ते नुकतेच इंग्लड दौरा खेळून यूएईत दाखल झाले आहेत. सीएसकेमध्ये अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आहे. त्याने देखील इंग्लंड दौरा केला आहे.
सीएसके तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला होता. यात त्यांनी कस्सून सराव केला आहे. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस सीएसकेच्या डावाची सुरूवात करतील. डू प्लेसिसने पहिल्या सत्रातील 7 सामन्यात 64 च्या सरासरीने 320 धावा केल्या आहे. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघात पावर हिटर खेळाडू असल्याने मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. रोहित शर्माला कर्णधारचे कौशल्य दाखवण्याची नामी संधी आहे. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी मातब्बर कर्णधार आहे. त्याच्यासमोर रोहितला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. दरम्यान, आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - सेहवागने सांगितलं, धोनी मेंटॉर म्हणून कसा भारतीय संघाचा संकटमोचक ठरू शकतो
हेही वाचा - IPL 2021 : वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीराबाबत विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया