चेन्नई - आयपीएल २०२१ आज डबल हेडरमधील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दिल्लीने ४ मधील ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे हैदराबादच्या संघाला ४ पैकी एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तीन सामने हैदराबादने गमावले आहेत.
सनरायजर्स हैदराबाद संघाने मागील सामन्यात विजय मिळवला होता. ही विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न हैदराबाद करेल. दुसरीकडे दिल्लीचा संघ देखील तुफान फॉर्मात आहे. यामुळे उभय संघातील हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. या सामन्याआधी आम्ही तुम्हाला उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही खास रेकॉर्ड याची माहिती देणार आहोत.
सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड -
- उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पहिल्यास हैदराबादचा पगडा भारी असल्याचे दिसून येते. हैदराबाद संघाने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने ७ सामने जिंकली आहेत.
- मागील वेळी जेव्हा भारतात हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. तेव्हा दिल्ली संघाने २ गडी राखून विजय मिळवला होता.
- दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा ऋषभ पंतने केल्या आहेत. त्याच्या नावे ३९४ धावा आहेत.
- सनरायजर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केन विल्यमसन याने सर्वाधिक ४०५ धावा केल्या आहेत.
- सनरायजर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फिरकीपटू राशिद खान याने सर्वाधिक १३ गडी बाद केले आहेत.
- दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध कगिसो रबाडाने सर्वाधिक ११ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - CSK VS RCB : नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
हेही वाचा - झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक