मुंबई - बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएल स्थगित झाल्यानंतर चार्टर्ड विमानाने मायदेशी सुरक्षित परतले आहेत. याची माहिती खुद्द मुस्तफिजूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
मुस्तफिजूर रहमानने, शाकिब अल हसन सोबतचा विमानातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहलं आहे की, 'आम्ही कोणत्याही त्रासाशिवाय सुरक्षित बांगलादेशमध्ये पोहोचलो आहोत. मी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आभार मानू इच्छितो. त्यांच्या मदतीमुळे हे शक्य झालं. मी आमच्या आरोग्य मंत्रालयाचे देखील आभार मानतो, त्यांनी देखील आम्हाला मदत केली.'
-
✈️ #KKR Overseas Players' Travel Update: Thank you @Sah75official, happy to know you've landed home safely in Dhaka with Bangladesh teammate @Mustafiz90 from Ahmedabad.
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Stay safe, and see you soon - ভাল থেকো 💜#KorboLorboJeetbo #IPL2021 pic.twitter.com/pgSCwcAKOG
">✈️ #KKR Overseas Players' Travel Update: Thank you @Sah75official, happy to know you've landed home safely in Dhaka with Bangladesh teammate @Mustafiz90 from Ahmedabad.
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 6, 2021
Stay safe, and see you soon - ভাল থেকো 💜#KorboLorboJeetbo #IPL2021 pic.twitter.com/pgSCwcAKOG✈️ #KKR Overseas Players' Travel Update: Thank you @Sah75official, happy to know you've landed home safely in Dhaka with Bangladesh teammate @Mustafiz90 from Ahmedabad.
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 6, 2021
Stay safe, and see you soon - ভাল থেকো 💜#KorboLorboJeetbo #IPL2021 pic.twitter.com/pgSCwcAKOG
दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा तात्काळ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू आपापल्या घरी परतत आहेत. आज ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवसाठी रवाना झाले आहेत. तर इंग्लंडचे ८ खेळाडू काही तासांपूर्वीच मायदेशी पोहोचले आहेत.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन खेळाडू पोहोचले मालदीवला; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार
हेही वाचा - कॅप्टन असावा तर असा! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान