मुंबई - बीसीसीआयने आज आयपीएल 2021 च्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता आयपीएल 2021 च्या सामन्याचा आनंद प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहून घेऊ शकतील. बीसीसीआयने प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी दिली आहे.
-
NEWS - VIVO IPL 2021 set to welcome fans back to the stadiums.
— IndianPremierLeague (@IPL) September 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details here - https://t.co/5mkO8oLTe3 #VIVOIPL
">NEWS - VIVO IPL 2021 set to welcome fans back to the stadiums.
— IndianPremierLeague (@IPL) September 15, 2021
More details here - https://t.co/5mkO8oLTe3 #VIVOIPLNEWS - VIVO IPL 2021 set to welcome fans back to the stadiums.
— IndianPremierLeague (@IPL) September 15, 2021
More details here - https://t.co/5mkO8oLTe3 #VIVOIPL
आयपीएल 2021 चे दुसरे सत्र यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे. या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने या सत्राला सुरूवात होणार आहे. या सत्रात मैदानावर उपस्थित राहून सामना पाहण्याची परवानगी प्रेक्षकांना मिळाली आहे. पण त्यांना कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
कोरोनामुळे आयपीएल 2021 चा, भारतातील हंगाम मध्यातून स्थगित करण्यात आला होता. हे सत्र विनाप्रेक्षक खेळवण्यात आले होते. पण आता उर्वरित हंगामाला पुन्हा सुरूवात होणार आहे.
आयपीएल 2021 च्या सामन्यांच्या तिकिटाची विक्रीला 16 सप्टेंबरपासून सुरूवात करण्यात येणार आहे. बीसीसीआयने आज बुधवारी याची माहिती दिली. तिकीट खरेदी आयपीएलच्या अधिकृत संकेसस्थळ www.iplt20.com यावरून देखील करता येईल. याशिवाय प्लेटिनमलिस्ट.नेट (PlatinumList.net) याच्या माध्यमातून देखील तिकीटाची विक्री केली जाणार आहे. दरम्यान, आयपीएल 2021 मधील राहिलेले 31 सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबी येथे खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - ICC T20 Rankings: विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा, क्विंटन डी कॉकची मोठी झेप
हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेटर पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर