अबुधाबी - येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज डबल हेडरमधील पहिला सामना खेळला जात आहे. दोन युवा कर्णधारांमध्ये हा सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी करण्यासाठी मैदानात उतरेल.
दिल्ली-राजस्थान संघात बदल
दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी मार्कस स्टॉयनिसच्या जागेवर ललित यादवला अंतिम संघात स्थान दिलं आहे. स्टॉयनिसला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे तो या सामन्यात फक्त 7 चेंडू फेकू शकला होता. दुसरीकडे राजस्थान संघाने इविन लुईस आणि ख्रिस मॉरिस यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागेवर तबरेज शम्सी आणि डेविड मिलरला अंतिम संघात स्थान दिले आहे.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन -
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबादा, एनरिक नार्त्जे आणि आवेश खान.
राजस्थान रॉयल्स संघाची प्लेईंग इलेव्हन -
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रेयान पराग, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान आणि तबरेज शम्सी.
हेही वाचा - IPL 2021 : सहा गडी राखत चेन्नईचा बंगळुरूवर विजय, गुणतालिकेत सीएसकेची अव्वल स्थानी झेप
हेही वाचा - SRH vs PBKS : प्ले ऑफची आशा कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार पंजाब किंग्स