RCB vs RR: आरसीबीचा विजयी लय राखण्याचा निर्धार; राजस्थानसाठी 'करो या मरो'ची लढत - RR vs RCB Dream11
आयपीएल 2021 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरूचा संघ आजचा सामना जिंकून प्ले ऑफमधील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे राजस्थान संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार आहे.
दुबई - गतविजेता मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आज बुधवारी राजस्थान रॉयल्स संघाची सामना होणार आहे. आरसीबी या सामन्यात विजयी लय कामय राखण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या आरसीबी संघाने 10 सामन्यात 12 गुणांची कमाई केली असून ते प्ले ऑफ फेरीच्या जवळ आहेत. आज त्यांनी जर राजस्थानचा पराभव केला. त्यांचे प्ले ऑफ फेरीतील जागा जवळपास निश्चित होईल. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने 10 सामन्यात 8 गुणांची कमाई केली आहे. त्यांच्यासाठी आजचा सामना 'करो या मरो' स्थितीतील आहे. राजस्थानचा आजच्या सामन्यात पराभव झाला तर त्यांची प्ले ऑफ फेरीची वाट खडतर होईल.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आरसीबीची सुरूवात खराब झाली. कोलकाता नाइट रायडर्स त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करत विजयी लय पकडली. हीच लय कायम राखण्याचा निर्धार आरसीबीचा असेल. विराट कोहलीने मागील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली आहे. दुसरीकडे ए बी डिव्हिलियर्स धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. त्याने मागील तीन सामन्यात 0, 12, 11 अशा धावा केल्या आहेत. त्याच्याकडून आजच्या सामन्यात मोठ्या खेळीची आशा आरसीबी संघाची असणार आहे. ग्लेन मॅक्सवेल तुफान फॉर्मात आहे. त्याने मागील सामन्यात 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत हर्षल पटेलने मागील सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने मागील तीन सामन्यात 6 गडी बाद केले आहेत. याशिवाय युझवेंद्र चहलने देखील 5 गडी बाद केले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनची दोन सामन्यात विकेटची पाटी रिकामी आहे.
दुसरीकडे राजस्थानने पहिला सामना दोन धावांनी जिंकला. यानंतर त्यांना दोन सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल वगळता राजस्थानचे इतर फलंदाज धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. संजू पहिल्या सामन्यात 4 धावांवर बाद झाला. यानंतर त्याने दोन सामन्यात 70 आणि 82 धावांची खेळी केली. परंतु त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. यामुळे राजस्थानचा पराभव झाला. गोलंदाजीत कार्तिक त्यागी, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रहमान चांगली कामगिरी करत आहे. पण जयदेव उनाडकट प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरला आहे.
- राजस्थान रॉयल्सचा संघ -
- संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, इविन लुइस, डेविड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशाने थामस, मुस्तफिजूर रहमान, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चेतन सकारिया, रियान पराग, राहुल तेवतिया, आकाश सिंह, अनुज रावत, केसी करियप्पा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे, जयदेव उनादकट, कुलदीप यादव आणि महिपाल लोमरोर.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -
- विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चियन, रजत पाटीदार, दुष्मंता चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन बेबी, वानिंदु हसरंगा, जार्ज गार्टन, युझवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडीक्कल, कायले जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टिम डेविड, आकाश दीप आणि ए बी डिव्हिलियर्स.
हेही वाचा - MI vs PBKS : पंजाबचे मुंबईसमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान
हेही वाचा - MI vs PBKS : मुंबईची पंजाबवर ६ गडी राखून मात; हार्दिक पंड्याची दमदार खेळी