ETV Bharat / sports

RR VS KKR : राजस्थान-कोलकातामध्ये आज लढत

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे.

ipl 2021 : Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders match review
RR VS KKR : राजस्थान-कोलकातामध्ये आज लढत
author img

By

Published : Apr 24, 2021, 3:29 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हे दोन्ही संघ पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

केकेआर आणि राजस्थान दोन्ही संघांच्या समस्या एकसारख्या आहेत. ती म्हणजे, पहिल्या फळीतील फलंदाज संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. गत सामन्यात दोन्ही संघांमधील मधल्या फळीतील फलंदाजांनी निर्णायक खेळी केली होती. परंतु विजयासाठी यापेक्षा चांगली कामगिरी करणे आवश्‍यक आहे.

कोलकाता संघाने सलामीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली. पण त्यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थाननेही चार सामन्यांपैकी तीन सामने गमाविले आहेत. आता दोन्ही संघ पुन्हा विजय मार्गावर परतण्यासाठी उत्सुक आहेत.

शुबमन गिल, इयॉन मॉर्गन राहुल, त्रिपाठी यांना मोठी खेळी करावी लागेल. नितीश राणाच्या कामगिरी सातत्य नाही. पण मागील चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने सूर गवसल्याचे संकेत दिले आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने शानदार फलंदाजी केली. दिनेश कार्तिकने या सामन्यात आपले मोलाचे योगदान दिले. मागील सामन्यात अंतिम संघात संधी मिळालेल्या सुनील नरेनला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडीत छाप सोडता आली नाही. केकेआरचे गोलंदाज प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांना राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश मिळवावा लागणार आहे.

दुसरीकडे बंगळुरू संघाकडून दारुण पराभव झाल्यानंतर राजस्थान संघ आज मैदानात उतरत आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या खेळी सात्यताचा अभाव दिसून येत आहे. जोस बटलर, मनन वोहरा आणि डेव्हिड मिलरही फॉर्मात नसल्याने संघ अडचणीत आहे. तसेच राजस्थान संघासाठी गोलंदाजीही डोकेदुखी ठरत आहे. कारण ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजूर रहमान हे धावा रोखण्यात अपयशी ठरत आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्‍स जखमी असल्याने संघाची समस्यादेखील वाढली आहे. यामुळे विजयासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे.

यातून निवडणार संघ -

  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मारकंडे, अँड्रयू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.
  • कोलकाता नाइट राइडर्स - इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सिफर्ट, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.