दुबई - आयपीएल 2021 मध्ये आज 32वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 185 धावा केल्या आहेत. पंजाबला विजयासाठी 186 धावांचे आव्हान मिळाले आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल (49) आणि महिपाल लोमरोर (43) यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने पंजाबसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले आहे. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या.
राजस्थान-पंजाब हेड टू हेड आकडेवारी
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आतापर्यंत 22 सामने झाली आहेत. यात राजस्थानने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबने 10 वेळा बाजी मारली आहे.
पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन -
केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, फॅबियन एलन, ईशान पोरेल, आदिल राशिद, हरप्रीत बराड, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन -
यशस्वी जैस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया आणि कार्तिक त्यागी.
हेही वाचा - KKR VS CSK : ..म्हणून मी जल्लोष साजरा करत नाही, वरुण चक्रवर्तीने सांगितलं कारण
हेही वाचा - अफगानिस्तानमध्ये IPL 2021च्या प्रसारणावर बंदी, तालिबान सरकारचे फर्मान