मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहरे पडले. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन बायो-बबलच्या त्रासामुळे आयपीएल सोडून गेला. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने आयपीएलमधून माघार घेतली आहे. याची माहिती राजस्थान रॉयल्स संघाने दिली.
राजस्थान रॉयल्स संघाने या संदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी अँड्र्यू टाय वैयक्तिक कारणामुळे आज सकाळी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाल्याचे म्हटलं आहे. टायला जर काही गजर भासली तर आम्ही त्याला नक्कीच मदत करू, असे देखील राजस्थानने म्हटलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर राजस्थान संघाचे निदेशक कुमार संगकारा यांनी ड्रेसिंग रुमममध्ये घोषणा केली की, टाय ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे आणि त्याची फ्लाइट रविवारी आहे.
अँड्र्यू टाय आयपीएलमधून बाहेर पडणारा राजस्थान रॉयल्सचा चौथा खेळाडू ठरला. याआधी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. तर लियाम लिव्हिंगस्टोन बायो-बबलच्या त्रासामुळे आयपीएल सोडून गेला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रदर्शन चांगले राहिलेले नाही. राजस्थानने आतापर्यंत ५ सामने खेळली आहेत. यात त्यांना २ सामन्यात विजय मिळवला आला आहे. तर राहिलेल्या तीन सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत.
हेही वाचा - CSK VS RCB : जडेजाने बंगळुरूचा पद्धतशीर कार्यक्रम केला, चेन्नईचा ६९ धावांनी विजय
हेही वाचा - लिहून घ्या, KKRचा 'हा' खेळाडू IPL संपेपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूत असेल - डेव्हिड हसी