चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज १४वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब-हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा पगडा भारी असल्याचे दिसून येते. हैदराबाद संघाने १६ सामन्यापैकी ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या पाच सामन्यात पंजाबच्या संघाला विजय साकारता आला आहे.
पंजाबचा संघ -
मयांक अग्रवाल, केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मोईजेस हेनरिक्स, निकोलस पूरम, दीपक हुडा, शाहरुख खान, फॅबियन एलेन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.
हैदराबादचा संघ -
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, विराट सिंह, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल.
हेही वाचा - IPL २०२१ Points Table : मुंबईचा पराभव पण नुकसान झालं चेन्नईचं
हेही वाचा - IPL २०२१ : जस्सी भाऊ काय केलंस हे! बुमराहच्या नावे IPLच्या इतिहासातील लाजिरवाणा विक्रम