मुंबई - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने शुक्रवारी पंजाब किंग्जचा पराभव केला. चेन्नईने या विजयासह गुणतालिकेत आपले खाते उघडले आणि त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले पाहा...
चेन्नईने पंजाबवर मोठ्या फरकाने विजय साकारला आणि याचाच फायदा त्यांना गुणतालिकेतही झाल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण आहेत. असे असले तरी चेन्नईने रनरेटच्या जोरावर मुंबईला धक्का दिला आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
पंजाबच्या संघाला या पराभवानंतर मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावरही पंजाबचा संघ आता सातव्या स्थानावर घसरलेला पाहायला मिळाला आहे. आठव्या स्थानावर सनरायजर्स हैदराबादचा संघ असून त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण आता त्यांचा आज दुसरा सामना मुंबई इंडियन्सबरोबर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर हैदराबादने विजय साकारला तर पंजाबचा संघ तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर जाऊ शकतो.
गुणतालिकेत बंगळुरूचा संघ दोन विजयांसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर दिल्ली दोन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाचव्या सहाव्या आणि सातव्या स्थानी एका विजयासह अनुक्रमे राजस्थान, कोलकाता आणि पंजाबचा संघ आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या स्थानी आहे.
हेही वाचा - IPL 2021 :CSK vs PBKS : दोन्ही किंग्जमध्ये चेन्नईच 'सुपर', पंजाबवर ६ विकेट्सनी मात
हेही वाचा - IPL २०२१ : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड