मुंबई - राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४५ धावांनी जिंकला. या विजयानंतर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेनने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने, आमच्या संघात मधल्या फळीत असे फलंदाज आहेत जे, कोणत्याही नंबरवर फलंदाजी करू शकतात, असे म्हटलं आहे.
राजस्थानविरुद्धचा सामना संपल्यानंतर बोलताना सॅम म्हणाला की, 'दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आमची सुरूवात खराब झाली. आम्हाला परिस्थिती जळवून खेळ करता आला नाही. पण त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात आम्ही परिस्थिती जुळवून घेण्यात यशस्वी ठरलो. ज्या पद्धतीने आमची फलंदाजीची फळी आहे ती पाहता आम्हाला फलंदाजीत फ्रिडम मिळालं.'
मी चेन्नईत चेन्नई संघाकडून कधी खेळलो नाही. पण जेव्हा ग्रुपमध्ये चर्चा झाली तेव्हा तेथील विकेट संथ असते. हे कळालं. मुंबईची खेळपट्टी देखील संथ होती. याचा फायदा आम्हाला झाला. आमच्या मधल्या फळीतील फलंदाज कोणत्या क्रमाकावर फलंदाजी करू शकतात. यामुळे फलंदाजी करण्यात मोकळीक मिळते असे देखील सॅमने सांगितलं.
दरम्यान, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानपुढे विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल राजस्थानचा संघ २० षटकात ९ बाद १४३ धावा करू शकला. या सामन्यात सॅम कुरेनने ६ च्या इकोनॉमीने धावा देत २ गडी बाद केले.
हेही वाचा - IPL २०२१ : 'बॉल सूखा है घूमेगा', चाणाक्ष धोनीची कमाल आणि राजस्थान पराभव
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली संघासाठी आनंदाची बातमी