ETV Bharat / sports

MI VS RR : मुंबईने राजस्थानचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, डी कॉकची धमाकेदार खेळी

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात तिसरा विजय मिळवला.

IPL 2021 : Mumbai Indians vs Rajasthan Royals Match updates
MI VS RR : मुंबईने राजस्थानचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, डी कॉकची धमाकेदार खेळी
author img

By

Published : Apr 29, 2021, 5:13 PM IST

Updated : Apr 29, 2021, 7:12 PM IST

नवी दिल्ली - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात तिसरा विजय मिळवला. आज डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबईने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी १७२ धावांचे आव्हान मुंबई समोर ठेवले होते. राजस्थानचे हे लक्ष्य मुंबईने १८.३ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावांची खेळी केली.

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि डी कॉक जोडीने ६ षटकात ४९ धावांची सलामी दिली. रोहितचा अडथळा ख्रिस मॉरिसने दूर केला. त्याने १४ धावा केल्या. रोहितचा झेल चेतन सकारियाने टिपला. त्यानंतर डी कॉकने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी केली. पण ख्रिस मॉरिसने सूर्यकुमारला बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १६ धावा केल्या. डी कॉकने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले. त्याला कृणाल पांड्याने चांगली साथ दिली.

विजय आवाक्यात आल्यानंतर कृणाल पांड्या फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. मुस्तीफिजूरने त्याला क्लिन बोल्ड केलं. त्याने २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर डी कॉक-पोलार्ड या जोडीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डी कॉकने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. तर पोलार्ड १६ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून मॉरिसने २ तर मुस्तफिजूरने एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जोस बटलर आणि मुंबईकर यशस्वी जैस्वाल या जोडीने राजस्थानला ७.४ षटकात ६६ धावांची दमदार सलामी दिली. राहुल चहरने जोस बटलरला बाद करत ही जोडी फोडली. बटलरने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासंह ४१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने यशस्वीने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. तेव्हा राहुल चहरनेच त्याला बाद केलं. यशस्वीने २० चेंडूत २ चौकार २ षटकारांसह ३२ धावांची खेळी साकारली.

संजू सॅमसन आणि शिवम दुबे या जोडीने राजस्थानला शतकी टप्पा पार करून दिला. सॅमसनचा अडथळा बोल्टने दूर केला. सॅमसनने २७ चेंडूत ५ चौकारासह ४२ धावा केल्या. अखेरच्या हाणामारीच्या षटकात दुबे बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३५ धावा केल्या. अखेरीस राजस्थानचा संघाला निर्धारित २० षटकात ४ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून राहुल चहरने २, बोल्ट आणि बुमराह यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

हेही वाचा - IPL २०२१ : कौतुकास्पद!, राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर

हेही वाचा - IPL २०२१ : खेळाडूंनंतर आता 'या' २ पंचांनी घेतली आयपीएलमधून माघार

Last Updated : Apr 29, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.