मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तेव्हा दीपक चहरच्या गोलंदाजीसमोर पंजाबच्या टॉप ऑर्डरने शरणागती पत्कारली. या दरम्यान एक अशी घटना घडली, ती पाहून कर्णधार महेंद्रसिंह धोनी डीआरएसचा किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
दीपक चहर त्याच्या स्पेलचा तिसरे षटक फेकत होता. त्याने या षटकात एका इनस्विंग चेंडूवर फलंदाजाविरुद्ध एलबीडब्लूचे अपील केले. पण पंचानी त्याचे अपील फेटाळून लावले. दीपक चहरला ही विकेट असल्याचा विश्वास होता. तेव्हा त्याने धोनीकडे इशारा करत डीआरएस घेण्याची मागणी केली. परंतु, धोनीने डीआरएस न घेता दीपक चहरला, जा.. जा... पुन्हा गोलंदाजीसाठी जा असे सांगितले.
-
Chahar (kid) : Daddy ( Dhoni) i want that Toy( review)
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) April 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Dhoni (daddy) : Chal you have enough lets go ... pic.twitter.com/ncL0lPnPTj
">Chahar (kid) : Daddy ( Dhoni) i want that Toy( review)
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) April 16, 2021
Dhoni (daddy) : Chal you have enough lets go ... pic.twitter.com/ncL0lPnPTjChahar (kid) : Daddy ( Dhoni) i want that Toy( review)
— AlreadyGotBanned 😄 (@KirketVideoss) April 16, 2021
Dhoni (daddy) : Chal you have enough lets go ... pic.twitter.com/ncL0lPnPTj
नंतर रिप्लेमध्ये फलंदाज एलबीडब्लू नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, धोनीच्या निर्णयाचे कौतूक होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दीपक चहरने या सामन्यात ४ षटकात केवळ १३ धावांत ४ गडी टिपले. त्याने मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन आणि दीपक हुडा यांना बाद केलं. चहरसह चेन्नईच्या इतर गोलंदाजांनी भेदक मारा केला. यामुळे पंजाबला २० षटकात ८ बाद १०६ धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईने हा सामना १५.४ षटकात चार गड्याचा मोबदल्यात सहज जिंकला.
हेही वाचा - IPL २०२१ : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड
हेही वाचा - पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येणार, केंद्र सरकारने दिली परवानगी