मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने शुक्रवारी विजयाचे खाते उघडले. चेन्नईने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. उभय संघातील सामना संपल्यानंतर पंजाब किंग्जचा युवा खेळाडू शाहरूख खान याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. या भेटीत धोनीने शाहरूखला काही टिप्स दिल्या. दरम्यान, दोघांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आयपीएलच्या अधिकृत्त सोशल मीडिया अकाउंटवरून देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, शाहरूख खानने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत ४७ धावांची चिवट खेळी केली. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पंजाबच्या टॉप ऑर्डरने चेन्नईच्या माऱ्यासमोर लोटांगण घातल्यानंतर शाहरूखने ही खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबला कशीबशी २० षटकात ८ बाद १०६ धावांपर्यंत मजल मारता आली.
-
The beauty of #VIVOIPL 😍#PBKSvCSK pic.twitter.com/xuAXsGW2pk
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The beauty of #VIVOIPL 😍#PBKSvCSK pic.twitter.com/xuAXsGW2pk
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2021The beauty of #VIVOIPL 😍#PBKSvCSK pic.twitter.com/xuAXsGW2pk
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2021
दरम्यान, धोनीचा हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना २०० वा सामना होता. या सामन्यात संघाने विजय मिळवत आपल्या कर्णधाराला खास गिफ्ट दिले. धोनीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. तेव्हा पंजाबने २० षटकात ८ बाद १०६ धावा केल्या. दीपक चहरने ४ षटकात केवळ १३ धावांत ४ गडी बाद करत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबचे हे आव्हान चेन्नईने १५.४ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. मोईन अलीने ३१ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. तर डू प्लेसिस ३६ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईचा पुढील सामना १९ एप्रिलला राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे.
हेही वाचा - पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येणार, केंद्र सरकारने दिली परवानगी
हेही वाचा - 'जा गोलंदाजीसाठी परत जा', धोनीने चहरला डीआरएस न घेऊ देता गोलंदाजीसाठी पाठवलं