ETV Bharat / sports

IPL २०२१ : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड - मुंबई वि. हैदराबाद ड्रीम ११

मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध शानदार विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादचा संघ बंगळुरू आणि कोलकाता संघाविरुद्ध पराभूत झाला आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला मुंबई आणि हैदराबाद सामन्याआधी उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही खास रेकॉर्डबद्दल माहिती देणार आहोत.

ipl-2021-mi-vs-srh-head-to-head-stats-and-numbers-match
IPL २०२१ : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी आणि रिकॉर्ड
author img

By

Published : Apr 17, 2021, 5:04 PM IST

चेन्नई - आयपीएल २०२१ हंगामातील ९वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघातील हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमध्ये होणार आहे. मुंबईचा आपल्या दोन सामन्यात एक विजय तर एक पराभव झाला आहे. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले आहेत.

मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध शानदार विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादचा संघ बंगळुरू आणि कोलकाता संघाविरुद्ध पराभूत झाला आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला मुंबई आणि हैदराबाद सामन्याआधी उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही खास रेकॉर्डबद्दल माहिती देणार आहोत.

मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड

  • उभय संघात आतापर्यंत १६ सामने झाली आहेत. यात मुंबई आणि हैदराबाद या संघाने प्रत्येकी ८-८ सामने जिंकली आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ बरोबरीत आहेत.
  • युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या मागील हंगामात मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात पराभूत केले होते.
  • मुंबई इंडियन्सकडून केरॉन पोलार्डने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने सनरायजर्सविरुद्ध ३८३ धावा केल्या आहेत.
  • सनरायजर्स हैदराबादकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक ४८८ धावा डेव्हिड वॉर्नरने केल्या आहेत.
  • जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक १२ गडी बाद केले आहेत.
  • सनरायजर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना सर्वाधिक १६ गडी बाद केले आहेत.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नाथन कूल्टर नाइल/मार्को जेनसन.

सनरायजर्स हैदराबादचा संभाव्य संघ -

डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम.

हेही वाचा - 'जा गोलंदाजीसाठी परत जा', धोनीने चहरला डीआरएस न घेऊ देता गोलंदाजीसाठी पाठवलं

हेही वाचा - IPL २०२१ : महेंद्रसिंह धोनीने दिला शाहरूखला कानमंत्र, फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.