अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये दुसऱ्या सत्रात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. उभय संघातील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स हेड टू हेड रेकॉर्ड -
उभय संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 वेळा आमने-सामने झाले आहेत. यातील 22 सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाला फक्त 6 सामने जिंकता आली आहे. मागील सहा हंगामात केकेआरला फक्त एका सामन्यात मुंबईवर विजय मिळवता आला आहे. मागील 12 पैकी 11 सामने मुंबईने जिंकली आहेत. ही आकडेवारी पाहता मुंबईचे पारडे जड आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन -
रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, सौरव तिवारी, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
केकेआरची प्लेईंग इलेव्हन -
शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लाकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचा - Aus W vs Ind W : राचेल हेन्सला दुखापत, दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता
हेही वाचा - MI v KKR : रोहित शर्मा केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळणार का? जाणून घ्या