अबुधाबी - आयपीएल 2021 च्या 31व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 92 धावांत ऑलआउट केलं. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, ए बी डिव्हिलियर्स सारखे दिग्गज पूर्णपणे फ्लॉप ठरले. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. तर आरसीबीकडून सर्वाधिक धावांचे योगदान देवदत्त पडीक्कल याने दिले. त्याने 22 धावा केल्या. डेब्यू केलेल्या श्रीकर भरतने 16 धावांचे योगदान दिले. आरसीबीच्या संघाला 20 षटके देखील पूर्ण खेळता आली नाहीत.
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आरसीबीची सुरूवात खराब झाली. दुसऱ्या षटकात कर्णधार विराट कोहली अवघ्या 5 धावा काढून बाद झाला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. यानंतर पावर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर देवदत्त पडीक्कल बाद झाला. त्याने 20 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्याला लॉकी फर्ग्युसन याने माघारी धाडले.
आरसीबीने पावर प्लेमध्ये 41 धावा धावफलकावर लावल्या. श्रीकर भरत 9व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर आंद्रे रसेलने ए बी डिव्हिलियर्सला पहिल्याच चेंडूवर बाद करत आरसीबीला जबर धक्का दिला.
आरसीबीने 10 षटकात 54 धावा केल्या. 12व्या षटकात वरुण चक्रवर्तीने धोकादायक ग्लेन मॅक्सवेल आणि वानिंदु हसरंगा यांना बाद केले. चक्रवर्तीपुढे त्याच्या तिसऱ्या षटकात सनिन बेबीची देखील शिकार केली. अखेरीस केकेआरच्या गोलंदाजांनी आरसीबीचे शेपूट स्वस्तात गुंडाळले. आरसीबीला कशीबशी 92 धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. लॉकी फर्ग्युसन याने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने 1 गडी बाद केला.
हेही वाचा - भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा
हेही वाचा - MI vs CSK : होय आम्ही चुकलो, मुंबई इंडियन्सचा पराभवानंतर कर्णधार केरॉन पोलार्डची कबुली