शारजाह - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आज डबल हेडरमध्ये दोन सामने होणार आहे. यातील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शारजाहच्या मैदानात रंगला आहे. प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात कोलकाताला विजय मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे दिल्लीचा संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ फेरीत थाटात प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहे. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआर 10 पैकी 4 सामने जिंकला आहे. तरी देखील ते प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून आहेत.
पृथ्वी शॉ आउट, स्टिव्ह स्मिथ इन; आंद्रे रसेल बाहेर
केकेआरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त आहे. यामुळे त्याच्या जागेवर स्टिव्ह स्मिथला अंतिम संघात स्थान दिले आहे. दुसरीकडे केकेआरने दोन बदल केले आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि आंद्रे रसेल संघाबाहेर गेले आहेत. त्यांच्या जागेवर संदीप वॉरियर आणि टिम साउथीला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. रसेल दुखापतीमुळे बाहेर आहे.
कोलकाता-दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड -
कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 26 सामने झाली आहेत. यात केकेआरचा पगडा भारी आहे. केकेआरने यातील 14 सामने जिंकली आहेत. तर दिल्लीचा संग 12 सामन्यात विजयी ठरला आहे.
- दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन :
- शिखर धवन, स्टिव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नार्खिया आणि आवेश खान.
- कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन :
- शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुनील नरेन, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन, संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा - IPL 2021 : हर्षल पटेलने हॅट्ट्रिक घेतलेले षटक, विराट ख्रिश्चियनला फेकण्यास देणार होता
हेही वाचा - RR VS SRH : हैदराबादचा राजस्थानवर सात गड्यांनी विजय; जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांची अर्धशतके