ETV Bharat / sports

IPL २०२१ : धोनी, रोहितनंतर मॉर्गनकडून झाली चूक, बसला १२ लाख रुपयांचा फटका

author img

By

Published : Apr 22, 2021, 2:57 PM IST

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यामध्ये कोलकाताच्या गोलंदाजांनी संथ गतीने गोलंदाजी केल्याने मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाला आहे.

IPL 2021, KKR vs CSK: Kolkata Knight Riders Skipper Eoin Morgan Fined Rs 12 Lakh For Slow Over-Rate Against Chennai Super Kings
IPL २०२१ : धोनी, रोहितनंतर मॉर्गनकडून झाली चूक, बसला १२ लाख रुपयांचा फटका

मुंबई - येथील वानखेडे स्टेडियममध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभव झाला. चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर कोलकात्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यामध्ये कोलकाताच्या गोलंदाजांनी संथ गतीने गोलंदाजी केल्याने मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाला आहे. कोलकाताची या सिझनमधील ही पहिलीच चूक आहे, त्यामुळे फक्त मॉर्गनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण, यापुढे जर अशीच चूक झाली तर मॉर्गनवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. दरम्यान, मॉर्गनच्या आधी अशी दंडात्मक कारवाई चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर देखील झाली आहे.

आयपीएलचा नियम काय सांगतो -

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला ९० मिनिटांत २० षटके पूर्ण करणे भाग आहे. यापूर्वी ९० व्या मिनिटाला २०वे षटक सुरू करावे असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत २० षटक पूर्ण करावे लागणार आहे. शिवाय या ९० मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला ८५ मिनिटांत एकूण २० षटके टाकणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये १४.१ षटके टाकावी लागणार आहेत.

काय होणार शिक्षा -

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा ही चूक झाली तर कर्णधाराला १२ लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कर्णधाराला २४ लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कर्णधारावर एका सामन्याची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर संघामधील खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनामधील २५ टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर संघामधील खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनामधील ५० टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून भरावी लागेल.

हेही वाचा - PBKS vs SRH : हैदराबादने विजयाचे खाते उघडले, पंजाबच्या पराभवाची हॅट्ट्रिक

हेही वाचा - IPL-2021 KKR VS CSK : चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक, कोलकातावर 18 धावांनी विजय

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.