ETV Bharat / sports

IPL 2021 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मोडला विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड - आयपीएल 2021

कर्णधार ऋषभ पंतने मंगळवारी झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 38 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने माजी कर्णधार विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडला. सेहवागने दिल्लीसाठी खेळताना 85 डावात 2 हजार 382 धावा केल्या होत्या. तर पंतने 75 डावात 2 हजार 390 धावा करत सेहवागला मागे टाकले.

Delhi captain Rishabh Pant
IPL 2021 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मोडला विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड
author img

By

Published : Sep 29, 2021, 7:41 PM IST

मुंबई - कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 3 गडी राखून पराभव केला. पण या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने विरेंद्र सेहवागचा एक रेकॉर्ड मोडला.

कर्णधार ऋषभ पंतने मंगळवारी झालेल्या सामन्यात 38 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने माजी कर्णधार विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडला. सेहवागने दिल्लीसाठी खेळताना 85 डावात 2 हजार 382 धावा केल्या होत्या. तर पंतने 75 डावात 2 हजार 390 धावा करत सेहवागला मागे टाकले. या यादीत दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 82 डावात 2 हजार 291 धावा केल्या आहेत. तर शिखर धवन 58 डावात 1 हजार 933 धावा करत या यादीत चौथ्या स्थानी आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे प्ले ऑफ फेरीतील स्थान जवळपास निश्चित आहे. दिल्लीने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. ते 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा असा केला पराभव -

कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव करत प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचे आव्हान कायम ठेवले आहे. कोलकाताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या समोर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर कोलकाताने दिल्लीचे हे आव्हान 3 गडी आणि 10 चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह कोलकाताच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. कोलकाताचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे.

हेही वाचा - फिरकीपटू कुलदीप यादववर यशस्वी शस्त्रक्रिया; सांगितलं कशावर करणार आता फोकस

हेही वाचा - लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.